चाळीसगावात पोलीस स्टेशनला कोंबड्या जमा करून शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:21 AM2021-08-25T04:21:16+5:302021-08-25T04:21:16+5:30

नारायण राणे यांनी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात ...

Shiv Sena agitation by collecting hens at police station in Chalisgaon | चाळीसगावात पोलीस स्टेशनला कोंबड्या जमा करून शिवसेनेचे आंदोलन

चाळीसगावात पोलीस स्टेशनला कोंबड्या जमा करून शिवसेनेचे आंदोलन

Next

नारायण राणे यांनी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा या चिथावणीखोर वक्तव्याची दखल घेऊन नारायण राणे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, तशी प्रथम खबर अहवालाची प्रत आम्हाला द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक कोंबड्या चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाडी यांच्याकडे सुपुर्द केल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, संघटक सुनील गायकवाड, भीमराव खलाने, तुकाराम पाटील, संजय संतोष पाटील, उपशहरप्रमुख शैलेंद्र सातपुते, मुराद पटेल, शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, रघुनाथ कोळी, दिलीप देवराम पाटील, अनिल पाटील, नकुल पाटील, अल्पसंख्यांक शहरप्रमुख वशीम चेअरमन, जावेद शेख, अण्णा पाटील, हिंमत निकम, अजीज मिर्झा, शुभम राठोड, सुभाष राठोड, दिनेश घोरपडे, दिलीप राठोड, अशोक बोराडे, सोमनाथ साळुंखे, आशिष सानप, सागर पाटील, रॉकी धामणे, विजय गायकवाड, सचिन भोई, संजय पाटील, भरत गायकवाड, नीलेश गुंजाळ, आबा सैदाणे, बालाजी कोळी, सागर कोळी, आधार गायकवाड, राजेंद्र शिंदे, बाला अहिरे, मयूर पाटील उपस्थित होते.

240821\24jal_5_24082021_12.jpg

नारायण राणे यांच्या निषेधार्थ कोंबड्या विजयकुमार ठाकुरवाड यांना देताना शिवसेनेचे पदाधिकारी. (छाया : जिजाबराव वाघ)

Web Title: Shiv Sena agitation by collecting hens at police station in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.