नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चाळीसगावात शिवसेना मदत केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 03:24 PM2019-11-15T15:24:12+5:302019-11-15T15:24:31+5:30
चाळीसगाव येथे शिवसेना मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
चाळीसगाव, जि.जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार चाळीसगाव येथे शिवसेना मदत केंद्राचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना नेहमी शेतकºयाच्या पाठीशी उभी असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या धोरणानुसार शिवसेना आजही बाळासाहेब ठाकरे याचा विचार शिवसेना जोपासत आहे. गेल्या पंधरवड्यात परतीच्या पावसामुळे अनेक शेतकºयांचे नुकसान झाले. शेतकºयांना तत्काळ शासकीय मदत मिळावी. तसेच झालेल्या वादळी पावसामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेली पिके आडवी झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढे हंगामामध्ये मिळणाºया जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न निकडीचा झालेला आहे. या ओल्या दुष्काळात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून शेतीमालासह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करता सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व ओल्या दुष्काळामध्ये आपद्ग्रस्त झालेल्या शेतकºयांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी. तसेच यासोबत शेतीनुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार तातडीची मदत मिळावी म्हणून शिवसेना मदत केंद्रांचे उदघाटन करण्यात आले. तसेच पीक विमा, तलाठी, ग्रामसेवक यांनी केलेल्या पंचनाम्याविषयी शेतकºयांनी काढलेल्या पीक विमा बँकेतील खात्याविषयी किंवा पंचनाम्यांसंदर्भात तक्रारी असल्यास शिवसेना उपजिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहरप्रमुख नानाभाऊ कुमावत यांच्याशी संपर्क साधून शेतकºयांनी जास्तीत जास्त शेतकरी यांनी फॉर्म भरण्यासाठी संपर्क साधून शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे यांनी केले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रमुखरमेश चव्हाण शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव खलाणे, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, शेतकरी सेना उपतालुकाप्रमुख सचिन ठाकरे, दिलीप आबा पाटील, अनिल राठोड, दिलीप पाटील, नीलेश गायके, बद्री चव्हाण, प्रभाकर उगले, पांडुरंग बोराडे, दिनेश घोरपड,े लक्ष्मण बोराडे, सचिन गुंजाळ, दिनेश विसपुते, बापू लोणकर, अनिल कुड,े अण्णा पाटील, सुभाष राठोड, मनोज कुमावत, सुमित शेळके, किशोर पाटील, तुकाराम पाटील, संदीप पाटील, संजय संतोष पाटील, शैलेंद्र सातपुत,े रघुनाथ कोळी आदी उपस्थित होते.