शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

By विलास बारी | Published: May 9, 2024 09:26 PM2024-05-09T21:26:14+5:302024-05-09T21:27:12+5:30

सुरेशदादा जैन यांच्याकडून गुरुवारी प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुरेशदादा जैन यांनी ही घोषणा केली आहे. १९७४ पासून सुरेशदादा जैन हे राजकारणात होते.

Shiv Sena leader Suresh Dada Jain resigns as primary member of Uddhav Sena | शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा


जळगाव : माजी मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला असून, सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. तसेच भविष्यात राष्ट्राच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या व जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते मार्गदर्शक भूमिकेत राहणार आहेत. याचबरोबर त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून समस्त शिवसैनिकांबद्दल प्रेम व आदर व्यक्त केलेला आहे.

सुरेशदादा जैन यांच्याकडून गुरुवारी प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुरेशदादा जैन यांनी ही घोषणा केली आहे. १९७४ पासून सुरेशदादा जैन हे राजकारणात होते. १९८० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर ते सलग ३४ वर्ष आमदार होते. १९८५ मध्ये ते नगराध्यक्ष झाले. १९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम त्यांना मंत्रिपद दिले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या केलेल्या कार्याचा आढावा ज्यामध्ये जळगाव शहराचा सर्वांगीण विकास, विशेषत: बीओटी तत्त्वावर बांधलेले संकुल, गोरगरीबांसाठी घरे आदी केलेल्या कामांमुळे ते प्रभावित झाले होते. त्यांनी सहकार क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला होता. ते जिल्हा बँक असो, दूध विकास, मिनी मंत्रालय असो वा साखर कारखाने असो. त्या काळामध्ये सहकार क्षेत्रात जिल्ह्याचे विकासाचे व्हिजन, शेतकरी व सामान्य जनता हे केंद्रबिंदू ठेवून त्यांनी काम केलेले होते.

२०१४ पासून प्रकृतीच्या कारणास्तव सुरेशदादा राजकारणातून बाहेर पडले. सर्व समाजातील नागरिक, व्यापारी व उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.

Web Title: Shiv Sena leader Suresh Dada Jain resigns as primary member of Uddhav Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.