बोदवड येथे घरकुलप्रश्नी शिवसेनेचा नगरपंचायतीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 06:36 PM2019-08-22T18:36:40+5:302019-08-22T18:39:41+5:30

भोगवटाधारकांना घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी लाभार्र्थींनी गुरुवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बोदवड नगरपंचायतीवर मोर्चा काढला.

Shiv Sena marches on Bodwad to house council | बोदवड येथे घरकुलप्रश्नी शिवसेनेचा नगरपंचायतीवर मोर्चा

बोदवड येथे घरकुलप्रश्नी शिवसेनेचा नगरपंचायतीवर मोर्चा

Next
ठळक मुद्देमुख्याधिकारी हजर नसल्याने तासभर ठिय्यातहसीलदारांनी नगरपंचायत कार्यालय गाठत स्वीकारले निवेदन

बोदवड, जि.जळगाव : भोगवटाधारकांना घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी लाभार्र्थींनी गुरुवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बोदवड नगरपंचायतीवर मोर्चा काढला.
शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी, बजरंगपुरा, विवेकानंद नगर, प्रभाग क्रमांक १६, १७ व आठमधील सुमारे चारशेवर भोगवट्याच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांनी गत ४० वर्षांपासून या जागेवर अतिक्रमण केले होते. याबाबत भुसावळ येथील प्रांताधिकारी कार्यालयात शासनाच्या या जागेवर त्यांनी गट क्रमांक ५७९, ५८० वर राहणारे अतिक्रमणाचे सुमारे ३७८ अतिक्रमणधारकांनी, मागासवर्गीय नागरिकांनी सात रुपये बाजारभाव तर इतर नागरिकांनी यापेक्षा अडीच पट दंड भरून रीतसर जागा नोंदणी केली. परंतु या जागेवर अद्यापही भूमापन विभागात नोंद केली नाही. वर्षानुवर्षे नगरपंचायतीला नळपट्टी, घरपट्टी व दिवाबत्ती कर भरूनही या जागेवर असलेल्या झोपड्या पाडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ नगरपंचायतीकडून मिळत नाही. घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी लाभार्र्थींनी नगरपंचायतीला लेखी तक्रारी दिल्या होत्या. त्यावर नगर पंचायतीने ही जागा शासनाच्या भूमापन विभागात नोंद तसेच बिगर शेत जमीनमध्ये नोंद नसल्याचे कारण सांगून घरकुलाच्या प्रकरणातून वगळले.
यामुळे गुरुवारी या परिसरातील सुमारे दोनशेवर झोपडपट्टीधारकांनी विवेकानंद नगरमधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर मोर्चा काढला. जिल्हा उपसंघटक अस्लम शेख, गजानन खोडके, शांताराम कोळी, गोपाळ पाटील, इस्राएल शेख, कलीम शेख, सुनील पाटील आदी शिवसेना पदाधिकारी तसेच या भागातील नागरिक उपस्थित होते.
नगरपंचायत कार्यालयात निवेदन देण्यासाठी आले. परंतु मुख्याधिकारी हजर नसल्याने जनभावनांचा आक्रोश व्यक्त वाढला अन् नगरपंचायत कार्यालयात तासभर ठिय्या मांडला. त्यानंतर तहसीलदार रवींद्र जोगी यांनी नगरपंचायत कार्यालय गाठत निवेदन स्वीकारले. याबाबत नगरपंचायत व भूमापन विभागालाही पत्र देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Shiv Sena marches on Bodwad to house council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.