चारचाकीचे टायर फुटून झालेल्या अपघातात शिवसेना पदाधिकारी ठार

By admin | Published: June 20, 2017 01:29 PM2017-06-20T13:29:46+5:302017-06-20T14:11:09+5:30

5 जखमींवर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार

Shiv Sena office bearer killed in an accident in a four-wheeler tire | चारचाकीचे टायर फुटून झालेल्या अपघातात शिवसेना पदाधिकारी ठार

चारचाकीचे टायर फुटून झालेल्या अपघातात शिवसेना पदाधिकारी ठार

Next

 ऑनलाईन लोकमत

जामनेर, दि.20- जामनेरकडे येत असलेल्या एमएच 19 बीजे 4271 या कारचे टायर मंगळवारी सकाळी 8 वाजता अचानक फुटल्याने शिवसेनेचे पदाधिकारी दिनेश लखोटे हे जागीच ठार झाले. अपघातातील जखमी सदस्यांवर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मंगळवारी सकाळी दिनेश लखोटे हे आपल्या कुटुंबातील 5 सदस्यांसह एमएच 19 बी.जे.4271 जामनेरकडे येत होते. या दरम्यान चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने त्यात दिनेश लखोटे यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनातील जखमींना नागरिकांनी बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी जळगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु आहे.

Web Title: Shiv Sena office bearer killed in an accident in a four-wheeler tire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.