चाळीसगाव तहसीलवर शिवसेनेचा धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 03:49 PM2019-11-25T15:49:24+5:302019-11-25T15:52:07+5:30
शिवसेनेतर्फे २५ रोजी सकाळी येथील तहसील कार्यालयावर शेतकºयांच्या प्रश्नांवर कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला.
चाळीसगाव, जि.जळगाव : तालुका शिवसेनेतर्फे २५ रोजी सकाळी येथील तहसील कार्यालयावर शेतकºयांच्या प्रश्नांवर कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत त्वरित मंजूर करावी, पीक विमा काढलेल्या शेतकºयांना पीक विमा त्वरित मिळावा, राज्यपालांनी जाहीर केलेली आर्थिक मदत शेतकºयांच्या खात्यात त्वरित जमा व्हावी, अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीमुळे शेतकºयांच्या कर्ज कपातीस बँकांना मनाई व्हावी या मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चात शिवसेनेचे सर्व शहर, तालुका पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी बांधव, शेतमजूर यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
शिवसैनिकांच्या घोषणांनी शहर दणाणले होते. तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव खलाने, रोहिदास पाटील, प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, शेतकरी सेना तालुकाप्रमुख संजय संतोष पाटील, धर्मा खंडू काळे, नंदकिशोर बाविस्कर, संजय ठाकरे, तुकाराम पाटील, हिंमत निकम, सुरेश पाटील, जगदीश महाजन, अनिल राठोड, अण्णा पाटील, सुभाष राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, विठ्ठल पवार, सुनील किरण घोरपडे, विलास शिंद,े प्रभाकर दिनेश घोरपडे, दिलीप पाटील, शैलेंद्र सातपुते, मनोज कुमावत, अनिल पाटील, सचिन ठाकर, अनिल राठोड, वसीम शेख, संदीप पाटील, सागर पाटील, गोपाल परदेशी, दिलीप राठोड, नंदू गायकवाड, पांडुरंग बोराडे, गणेश भवर, संतोष गायकवाड, गोपाल पाटील, सचिन गुंजाळ, अनिल कुठे, दिनेश विसपुते, राजू शेळके, सुमित शेळके, शुभम शिंदे, अमोल चौधरी, रवींद्र चौधरी, सुनील पवार, बापू आगवणे आदी उपस्थित होते.