गोरगरीबांच्या सेवेसाठी शिवसेना कटीबद्ध : गुलाबराव पाटील

By Admin | Published: May 25, 2017 02:52 PM2017-05-25T14:52:46+5:302017-05-25T14:52:46+5:30

पाळधी येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

Shiv Sena is ready to serve the poor: Gulabrao Patil | गोरगरीबांच्या सेवेसाठी शिवसेना कटीबद्ध : गुलाबराव पाटील

गोरगरीबांच्या सेवेसाठी शिवसेना कटीबद्ध : गुलाबराव पाटील

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि.25-  गोरगरीब रुग्णांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा व ख:या अर्थाने त्यांची सेवा करता यावी यासाठी हिच शिवसेनेची भूमिका असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले. या शिबिरात सुमारे 52 शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
स्व.पी.पी.पाटील यांच्या स्मरणार्थ धरणगाव व जळगाव तालुक्यातील शिवसैनिकांतर्फे कांताई नेत्रालय यांच्या सहकार्याने मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले होते. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे संघटक डॉ.राजेंद्र फडके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती सचिन पवार, जि.प.सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, पं.स.सदस्य मुकुंद नन्नवरे, डॉ.संजय चव्हाण, डॉ.संजय सोनवणे, डॉ.शिवराज पाटील, कांताई फाउंडेशनतर्फे डॉ.अमर चौधरी, डॉ.अरविंद राणे, माजी जि.प.सदस्य विश्वनाथ पाटील, डॉ.व्ही.आर.पाटील, डॉ.विजय विचवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र चांदसर अंतर्गत 14 गावातील 589 रुग्णांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. तर 52 रुग्णांवर जळगावातील कांताई नेत्रालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.
यशस्वीतेसाठी मुकुंद नन्नवरे, आबा माळी, चिंटू कोळी, हर्षल पाटील, मनोज नन्नवरे, भूषण पाटील,डॉ.शिवराज पाटील यांच्यासह कार्यकत्र्यानी परिश्रम घेतले.

Web Title: Shiv Sena is ready to serve the poor: Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.