शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा’ अभियान

By Ajay.patil | Published: October 1, 2023 08:03 PM2023-10-01T20:03:20+5:302023-10-01T20:05:26+5:30

६७ गावांमध्ये जाऊन, घेणार नागरिकांचा कल : आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गट ‘मिशन मोड’वर

shiv sena thackeray group campaign in jalgaon taluka | शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा’ अभियान

शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा’ अभियान

googlenewsNext

अजय पाटील, जळगाव - आगामी वर्षात लोकसभा व विधानसभेसोबतच होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मिशन मोड वर आला आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने १ ते ९ ऑक्टोबरदरम्यान जळगाव तालुक्यातील ६७ गावांमध्ये ‘होऊ द्या चर्चा’ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची सुरुवात रविवारी तरसोदपासून सुरु झाली.

तर ९ ऑक्टोबर रोजी अभियानाचा समारोप आसोदा या गावात होणार आहे. हे अभियान जिल्हाभर राबविले जात असून, त्यात जळगाव तालुक्यात विशेष भर दिला जात आहे. जळगाव तालुक्यातील जवळ-जवळ सर्वच म्हणजे ६७ गावांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झालेली कामे, सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील गैरकारभार, दिलेली आश्वासन व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जनतेमध्ये जाऊन चर्चा केली जाणार आहे. या प्रकारचे अभियान जळगाव शहरात देखील प्रभागनिहाय राबविले जाणार आहे.

Web Title: shiv sena thackeray group campaign in jalgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.