जळगाव मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे २० स्टार प्रचारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:43 IST2018-07-11T13:39:40+5:302018-07-11T13:43:43+5:30
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्याची आज शेवटची मुदत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आता प्रचाराचे नियोजन सुरु केले आहे. शिवसेनेच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह २० जण निवडणुकीच्या महासंग्रामात उतरणार आहेत.

जळगाव मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे २० स्टार प्रचारक
जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्याची आज शेवटची मुदत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आता प्रचाराचे नियोजन सुरु केले आहे. शिवसेनेच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह २० जण निवडणुकीच्या महासंग्रामात उतरणार आहेत.
शिवसेनेचे सेक्रेटरी व खासदार अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयोगाला जळगाव व सांगली महानगरपालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीतील प्रचारासाठी २० स्टार प्रचारकांची यादी पाठविली आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत, माजी मंत्री गजानन किर्तीकर, खासदार आनंदराव अडसूळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, ग्रामविकास राज्य मंत्री दादा भुसे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, खासदार अरविंद सावंत, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरूळकर, शिवसेना प्रवक्ते व आमदार डॉ.नीलम गो-हे, उपनेते नितिन बानगुडे-पाटील, उपनेते दगडू सपकाळ, शिवरत्न शेट्टी यांचा समावेश आहे.