चाळीसगावात पेट्रोल-डिझेल भाववाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 02:24 PM2020-12-12T14:24:52+5:302020-12-12T14:27:05+5:30
शनिवारी चाळीसगाव येथे शिवसेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.
Next
ठळक मुद्देपेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध.
ल कमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असून या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी चाळीसगाव येथील शिवसेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवणाऱ्या रावसाहेब दानवे यांचादेखील निषेध करण्यात आला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, उपतालुकाप्रमुख तुकाराम पाटील, शैलेंद्र सातपुते, रवींद्र चौधरी, रामेश्वर चौधरी, जगदीश महाजन, रघुनाथ कोळी, प्रभाकर उगले , अनिल राठोड, दिलीप पाटील, प्रकाश चौधरी, वशिम चेअरमन, सचिन ठाकरे, दिनेश घोरपडे, चंद्रकांत नागणे, नकुल पाटील, गणेश भवर, रॉकी धामणे, मधुकर कडवे, राजेंद्र प्रेमदास पाटील, शाहरुख शहा मुन्ना शहा, संमत कुरेशी मज्जिद, भैय्यासाहेब नन्हेराव आदी उपस्थित होते.याचवेळी मजरे येथील सुरेश हिलाल पाटील, राजू दिघोळे, हिरामण गुलाब पवार, खंडेराव हिलाल पाटील, समाधान अशोक पाटील, गोपीचंद संपत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवबंधन घालून स्वागत करण्यात आले.