अंत्योदयच्या लाभासाठी शिवसेनेचा पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:21+5:302021-06-20T04:12:21+5:30
जामनेेर : अपंग व विधवा, निराधारांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा यासाठी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख पवन माळी, शेंदुर्णीचे ...
जामनेेर : अपंग व विधवा, निराधारांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा यासाठी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख पवन माळी, शेंदुर्णीचे विलास पाटील, काशीनाथ शिंदे यांनी पुरवठा विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे सुमारे साडेपाचशे लाभार्थींना लाभ मिळणार असल्याचे माळी यांनी सांगितले.
जळगाव येथे अपंग व विधवा यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा व आणि मागे जे आंदोलन केले जामनेर तहसीलमधून अंत्योदयची यादी जाहीर झाली असता जामनेर तहसीलचे म्हणणे अंत्योदय इष्टक शिल्लक नाही त्यासंबंधी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व अपंग जनता दल जिल्हाप्रमुख पवन माळी, शेंदुर्णी शहरप्रमुख विलास पाटील, शिवसैनिक काशीनाथ शिंदे यांनी यासंबंधी अपंग व विधवा यांची तहसीलमधून मिळालेली यादी घेऊन पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी सांगितले, जामनेर तालुक्यासाठी ५५३ लोकांचा इष्टक शिल्लक आहे आणि अपंग बांधवांना अंत्योदयचा लाभ मिळालाच पाहिजे. आज पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता ते लवकरच जामनेर तहसीलला अहवाल पाठवणार आहेत.