शिवसेनेचा स्वीकृत नगरसेवक ठरणार ईश्वरचिठ्ठीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:13 AM2021-06-28T04:13:21+5:302021-06-28T04:13:21+5:30

जळगाव : शिवसेना स्वीकृत नगरसेवकाची निवड अनेक महिन्यांपासून रखडली आहे. जागा एक आणि इच्छुक अनेक असल्याने एका नावाची निवड ...

Shiv Sena's sanctioned corporator will be by God's letter | शिवसेनेचा स्वीकृत नगरसेवक ठरणार ईश्वरचिठ्ठीने

शिवसेनेचा स्वीकृत नगरसेवक ठरणार ईश्वरचिठ्ठीने

Next

जळगाव : शिवसेना स्वीकृत नगरसेवकाची निवड अनेक महिन्यांपासून रखडली आहे. जागा एक आणि इच्छुक अनेक असल्याने एका नावाची निवड करताना शिवसेना नेतृत्वाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. आता इच्छुक ठाम असल्याने सेनेच्या स्वीकृत नगरसेवकाची निवड ईश्वरचिठ्ठीने होणार असल्याची माहिती सेनेच्या सूत्रांनी दिली आहे. यामध्ये जाकीर पठाण, विराज कावडिया व दिनेश जगताप यांचे नाव आघाडीवर आहे.

ममुराबाद नाक्याचा रस्ता चिखलमय

जळगाव : शहरातील शनिमंदिर ते ममुराबाद नाक्यादरम्यानच्या रस्त्यालगत अमृत भुयारी गटार योजनेचे काम झाले असून, रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने पावसामुळे हा पूर्णपणे चिखलमय झाला आहे. यामुळे या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. याबाबत स्थानिक नगरसेवकांकडे नागरिकांनी तक्रार केल्यानंतरही नगरसेवक लक्ष द्यायला तयार नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

बांधकाम साहित्यामुळे रस्ता ब्लॉक

जळगाव - शहरातील सायली हॉटेलकडून स्टेडिअमकडे येणाऱ्या रस्त्यालगत एका बांधकामाच्या ठिकाणचे साहित्य, वाळू व विटा थेट रस्त्यालगत टाकण्यात येत असल्याने या रस्त्यावरून जाण्यास वाहनधारकांना अडचण येत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांनी रस्त्यालगतच झोपडीदेखील तयार केली आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

‘त्या’ बिबट्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट

जळगाव - जानेवारी महिन्यात ममुराबाद शिवारात मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण सहा महिन्यांनंतरदेखील अजूनही स्पष्ट झालेले नाही. बिबट्याचा मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर यासंबंधीचा अहवाल नाशिक येथे पाठविण्यात आला असून, अजूनही नाशिकहून व्हिसेराची तपासणी झालेली नाही. यामुळे बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकले नाही. तसेच नेमक्या बिबट्या आला कोठून, याचेही कारण वनविभागाला समजू शकलेले नाही.

Web Title: Shiv Sena's sanctioned corporator will be by God's letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.