शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:24 PM2019-03-01T17:24:03+5:302019-03-01T17:25:21+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाणलोट व्यवस्थापन, कौशल्य नीती, युद्धनीती, शेतीविषयक धोरण, गनिमी कावा इत्यादी धोरणांचा जगातल्या विविध प्रगत देशांनी आपल्या विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तिचे राजे आहेत, असे विचार प्रा.डॉ.जाकीर पठाण यांनी व्यक्त केले.

Shivaji Maharaj is the World's favorite King | शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे राजे

शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे राजे

Next
ठळक मुद्देभडगाव येथे प्रा.डॉ.जाकीर पठाण यांचे प्रतिपादनकेशवसूत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमालावक्त्यांनी दिली विविध ऐतिहासिक उदाहरणे

भडगाव, जि.जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाणलोट व्यवस्थापन, कौशल्य नीती, युद्धनीती, शेतीविषयक धोरण, गनिमी कावा इत्यादी धोरणांचा जगातल्या विविध प्रगत देशांनी आपल्या विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तिचे राजे आहेत, असे विचार जालना येथील लेखक प्रा.डॉ.जाकीर पठाण यांनी येथील केशवसूत ज्ञानप्रबोधिनीच्या रौप्य महोत्सवाच्या व्याख्यानातील पहिले पुष्प गुंफताना व्यक्त केले.
व्यासपीठावर या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रा.एल.जी.कांबळे व बांधकाम व्यावसायिक संभाजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रा.पठाण पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे होते. १८ पगड जातीचे त्यांनी नेतृत्व केले. त्यांच्या संपूर्ण कारकीर्र्दीत त्यांनी कोणत्याही जातीधर्माचा विचार केला नाही. त्यामुळेच त्यांच्या राज्यकारभारात व सैन्यात सर्वसमावेशकता दिसून येते. आयुष्यातील त्यांच्या प्रत्येक कामगिरीत मातोश्री जिजाऊंची त्यांना खंबीर साथ होती. वयाच्या तेराव्या वर्र्षी स्वराज्याचे तोरण बांधण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या या राज्यासाठी अनेक निष्ठावान सैनिकांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे प्रतिनिधित्व करणारे राजे होते, अशा विविध ऐतिहासिक उदाहरणांद्वारे प्रा.पठाण यांनी पटवून दिले. प्रास्ताविक ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष विजय देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अतुल देशमुख यांनी केले, तर आभार डॉ.विलास देशमुख यांनी मानले.

Web Title: Shivaji Maharaj is the World's favorite King

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.