शिवाजीनगर उड्डाणपुलाचा मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:35 PM2018-12-07T23:35:57+5:302018-12-07T23:45:45+5:30

जळगावातील ब्रिटीशकालीन शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण झाला

Shivajinagar flyover when the Muhurat? | शिवाजीनगर उड्डाणपुलाचा मुहूर्त कधी?

शिवाजीनगर उड्डाणपुलाचा मुहूर्त कधी?

Next

विकास पाटील
जळगावातील ब्रिटीशकालीन शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्या जागी नवीन पूल उभारणे आवश्यक असताना शासन चालढकल करीत आहे. पूल कोसळणार तेव्हा शासनाला जाग येईल की काय? असा सवाल जळगावकरांकडूनउपस्थित होत आहे.
जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरासह जळगाव, यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांना जोडणारा हा अत्यंत महत्वपूर्ण पूल असल्याने त्यावरुन रात्रंदिवस वाहतूक सुरु असते. १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने हा पूल जीर्ण झाला असून धोकादायक बनला आहे. त्यावरुन अवजड वाहतूक अव्याहतपणे सुरु राहिल्यास तो कोसळू शकतो व मोठी जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे सुमारे दीड वर्षांपासून या पुलावर क्रॉसबार बसवून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो वाहनधारकांना ८ किलो मीटरच्या फेऱ्याने दुसºया मार्गाने प्रवास करावा लागत आहे. सुरक्षेसाठी नागरिक हात्रास सहन करीत आहे मात्र कधीपर्यंत?
या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याची जबाबदारी ज्या शासन व प्रशासनावर आहे त्यांच्याकडून चालढकल होत आहे. ही चालढकल जीवावर बेतू शकते. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर शासन व प्रशासन जागे होत असते. हे आपण नेहमीच अनुभवतो. मुंबईतील एल्फीन्स्टन पुलाचे उदाहरण बोलके आहे. निष्पाप, निरपराध जीव जाण्यापूर्वी शासन व प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा आराखडा तयार झाला. रेल्वे प्रशासन त्यांचे काम करण्यात तयार आहे. मात्र राज्य शासनाचा सार्वजनिक विभाग निर्णय घेण्यास तयार नाही.
या पुलाच्या टी आकाराच्या आराखड्यास शिवाजीनगरवासीयांचा विरोध आहे. त्यांचा विरोध न जुमानता टी आकारातच उड्डाणपूल उभारण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव दौºयात जाहीर केले आहे. लोकभावनांचा शासन व प्रशासनाने आदर करणे आवश्यक आहे. मात्र कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. हे योग्य नाही. पूल उभारण्यापूर्वी शिवाजीनगरवासीयांचे म्हणणे जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही त्यांची भूमिका समजून घेण्यात आलेली नाही. त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढून पुलाचे काम लवकरमार्गी लावणे आवश्यक आहे. कारण चार तालुक्यातील रहिवाशांना दैना झालेल्या पर्यायी रस्त्यावरुन दररोज ये-जा करावी लागत आहे. पूल उभारण्यात आणखी दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाईल. तोपर्यंत हालअपेष्टा नागरिकांना सहन कराव्या लागतील.
जळगाव जिल्ह्णाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. पाटील यांची ओळख कार्यतत्पर मंत्री म्हणून आहे. त्यांनी जळगावकरांच्या सोयीसाठी तत्परतेने निर्णय घेणे आवश्यक आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा विषय त्यांच्याच विभागाशी संबधित असल्याने त्यांना हा प्रश्न मार्गी लावण्यात अडचण नसावी. बघूया चंद्रकांत पाटील हे या पुलाचा विषय कधी मार्गी लावतात.

Web Title: Shivajinagar flyover when the Muhurat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव