विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:21+5:302021-06-09T04:20:21+5:30
पारोळ्यात ऑनलाईन कार्यक्रम शिवस्वराज्य दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सि. गो. पाटील ...
पारोळ्यात ऑनलाईन कार्यक्रम
शिवस्वराज्य दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सि. गो. पाटील महाविद्यालयाच्या वतीने ‘शिवस्वराज्य दिन’ ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, डॉ. संजय सोनवणे, प्राचार्य एस. टी. सोनवणे, प्राचार्य पी. एस. सोनवणे, प्राचार्य ए. पी. खैरनार, प्राचार्य सुरेश अहिरे, उपप्राचार्य अनंत पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सचिन नांद्रे यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मानले.
सावखेडा ग्रामपंचायत
सावखेडा, ता. अमळनेर : ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. सरपंच हेमलता कदम यांच्या हस्ते भगवा ध्वज व गुढी उभारण्यात येऊन विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच लखन कदम, ग्रामसेवक मनोज दहिवदकर यांच्यासह ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.
साळवा ग्रामपंचायत
साळवा ग्रा. पं. कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सरपंच इशा बोरोले यांच्या हस्ते भगवा ध्वज व गुढी उभारण्यात येऊन विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी उपसरपंच सतीश पवार, ग्रामसेवक यांच्यासह ग्रा. पं. सदस्य व ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते.
नांदेड ग्रा. पं. कार्यालय
नांदेड ग्रा. पं कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भगवा ध्वज व गुढी उभारण्यात येऊन विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी उपसरपंच रमेश कोळी, प्रशांत अत्तरदे, ग्रा. पं. सदस्य व ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते.
पहूर पेठ व कसबे ग्रामपंचायत
पहूर, ता. जामनेर : पहूर पेठ व कसबे ग्रामपंचायतीमध्ये स्वराज्य ध्वजाचे पूजन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. पेठ ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सरपंच नीता पाटील, उपसरपंच शामराव सावळे, सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, प्रगतशील शेतकरी अशोक पाटील, शेतकी संघ संचालक साहेबराव देशमुख, मुख्याध्यापक आर. बी. पाटील, सलीम शेख गणी, ईश्वर देशमुख, संजय तायडे उपस्थित होते.
सायगाव येथे शिवराज्याभिषेक सोहळा
सायगाव, ता. चाळीसगाव : कसबे ग्रामपंचायतमध्ये सरपंच आशा शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, माजी सरपंच शंकर जाधव, माजी सरपंच विनोद थोरात, अशोक जाधव, शिवाजी राऊत, विक्रम घोंगडे, शंकर घोंगडे, ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर उपस्थित होते. स्थानिक शाळा, पहूर पोलीस स्टेशनमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
वडजी ग्रामपंचायत
वडजी, ता. भडगाव : वडजी ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. सरपंच मनीषा गायकवाड, उपसरपंच सुरेखा पाटील यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य रामकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, स्वदेश पाटील, भाऊसाहेब परदेशी, विकास सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कैलास पाटील, किशोर मोरे, समाधान मोरे, संभाजी मोरे, महेमुद पटेल, सुधाकर पाटील, ग्रामविकास अधिकारी ए. एम. राठोड, पोलीस पाटील कैलास मोरे, पिंटू गायकवाड, पांडुरंग पाटील, विक्रम पाटील, रणधीर पाटील, भाईदास पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी मधुकर पाटील, सतीलाल पाटील, बापूराव पाटील, सोनू पाटील, अतुल पाटील, रवींद्र चव्हाण उपस्थित होते.