दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेतर्फे सहा हजार विद्यार्थ्यांना वह्या वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 03:44 PM2019-07-02T15:44:55+5:302019-07-02T15:46:06+5:30
चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेतील सर्व शाळेमधील विद्यार्थी व गोरगरीब असे एकूण सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना शिवसेनेतर्फे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला.
चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील जिल्हा परिषदेतील सर्व शाळेमधील विद्यार्थी व गोरगरीब असे एकूण सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना शिवसेनेतर्फे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. त्याचा प्रारंभ गणेशपूर, पिंप्री, पातोंडा या शाळेपासून झाला.
शिवसेनेचे जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी व संयोजक, जिल्हा उपप्रमुख उमेश गुंजाळ या प्रमुख मान्यरांच्या हस्ते वह्या वाटपाचा कार्यक्रम झाला. शिवसेनेचे दिवंगत जिल्हा उपप्रमुख पप्पू गुंजाळ यांनी सुरू केलेल्या आमची बांधिलकी जनतेशी हा उपक्रम त्यांचे बंधू उमेश गुंजाळ यांनी परंपरा खंडित होऊ न देता सुरू केला. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते दिलीप घोरपडे, भीमराव खलाणे, त्र्यंबक जाधव यांच्यासह गावातील सरपंच, सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की, दुष्काळग्रस्त परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. प्रकाश वाणी यांनी सांगितले की, शिवसेनेने प्रथम शेतकरी पीक विमा व त्यांच्या पाल्ल्यांच्या गरजा भागवण्यासाठी वह्या पुरविल्या आहेत. संयोजक उमेश गुंजाळ म्हणाले की, तालुक्यातील तळागळापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदतीचा हात पोहचवावा यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.