शिवसैनिक शेतकऱ्याने आशिष शेलारांच्या तोंडावर मारला दगड अन् फुटला टीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 10:41 PM2019-11-25T22:41:00+5:302019-11-25T22:42:17+5:30

राज्यात सत्ता स्थापनेच्या घोळाबद्दल ग्रामीण भागातही उद्रेक असल्याचा प्रत्यय सोमवारी रात्री उमटला.

Shivsena farmer kills stone and burst TV in Ashish Shelar's mouth | शिवसैनिक शेतकऱ्याने आशिष शेलारांच्या तोंडावर मारला दगड अन् फुटला टीव्ही

शिवसैनिक शेतकऱ्याने आशिष शेलारांच्या तोंडावर मारला दगड अन् फुटला टीव्ही

Next
ठळक मुद्देसत्ता स्थापनेच्या घोळाचा ग्रामीण भागातही उद्रेककधी होणार सरकार स्थापन अन् केव्हा मिळणार शेतकºयाला न्याय?

सुनील लोहार
कुºहाड, ता.पाचोरा, जि.जळगाव : राज्यात सत्ता स्थापनेच्या घोळाबद्दल ग्रामीण भागातही उद्रेक असल्याचा प्रत्यय सोमवारी रात्री उमटला. भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेचे वृत्तांकन टीव्हीवर दाखविणे सुरू होते. तेव्हा निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या फकिरा बाजीराव शिंदे (वय ४४) या शेतकºयाने आशिष शेलार यांनाच दगड मारून फेकला. त्यात २१ इंची टीव्ही संचच फुटला.
सध्या राज्यात सत्ता स्थापनेचे नवनवीन चर्चेेचे गुºहाळ सुरू आहे. दररोज विविध समाज माध्यमातून या राजकारणी नेत्यांच्या अनेक स्फोटक बातम्या पाहण्यास मिळत आहेत. दररोजच्या बैठका, पत्रकार परिषद अशा विविध माध्यमातून अजूनपर्यंत काही तोडगा निघत नाही. त्यातच सध्या राज्यात ओल्या दुष्काळाच्या झळा बळीराजा सोसत असून, शेती उत्पन्नात शेतकरी १०० टक्के उद्ध्वस्त झालेला आहे. या सत्तास्थापनेच्या गोंधळात शेतकरी हिताचा विषय बाजूला राहत आहे. तसेच राज्यपालांनी जाहीर केलेली मदतसुद्धा तुटपुंजी असून आणि शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय होत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. सोमवारी रात्री भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेचे वृत्तांकन टीव्हीवर दाखविणे सुरू होते. तेव्हा कुºहाड, ता.पाचोरा येथील शिवसैनिक फकिरा शिंदे या संतप्त शेतकºयाने आशिष शेलार यांनाच दगड मारून संताप व्यक्त केला. त्यात शिंदे यांच्या घरातील २१ इंच टीव्हीच फुटला.
या घटनेतून ग्रामीण भागातसुद्धा या सरकार स्थापनेचा रोष ठिकठिकाणी पाहण्यास मिळत आहे.

Web Title: Shivsena farmer kills stone and burst TV in Ashish Shelar's mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.