शिवसेना पदाधिका:यांवर गुन्हे दाखल
By admin | Published: January 24, 2017 12:37 AM2017-01-24T00:37:28+5:302017-01-24T00:37:28+5:30
शिवराय पुतळा जागा वाद : सरकारी कामात अडथळ्याचा आरोप
नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवितांना शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांच्या आदेशाला न जुमानल्याप्रकरणी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह सुमारे दीडशे कार्यकत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारात पालिकेच्या जुन्या इमारतीच्या जागी बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचा वाद सुरू आहे. पूर्वीच्याच जागेवर पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेने वर्षभरापासून आंदोलन सुरू ठेवले.
रविवारी सेनेनेच पुतळा आणून तो त्या जागेवर बसविला. यावेळी पोलिसांनी विरोध केला असता वाद झाला. पोलिसांनी पुतळा परत केल्यावर त्या ठिकाणी पुतळा बसविण्यात आला.
याप्रकरणी हवालदार विजय बोरसे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या लेखी आदेशाला न जुमानता रॅली काढणे, बंदोबस्तावरील पोलीस कर्मचा:यांना धक्काबुकी करणे, धमकी देणे व सरकारी कामात अडथळा आणणे याप्रकरणी सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, श्याम मराठे, चारूदत्त कळवणकर, देवेंद्र जैन, अजरुन मराठे, नरेंद्र पाटील यांच्यासह दीडशे कार्यकत्र्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक भोसले करीत आहे.