भडगाव येथे नुकसान भरपाईसाठी शिवसेनेतर्फे रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 05:00 PM2019-11-20T17:00:58+5:302019-11-20T17:28:12+5:30
शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी या मागणीसाठी बुधवारी शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
भडगाव, जि.जळगाव : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी या मागणीसाठी बुधवारी शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे शहरातील पारोळा-चाळीसगाव चौफुलीवर वाहतूक ठप्प झाली होती.
अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पिक बाधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांनी हेक्टरी फक्त आठ हजार रुपये मदत देवू केली आहे. ती मदत तुटपुंजी आहे. ही शेतकºयांची क्रूर थट्टाच आहे. तरी राज्यपालांनी, शासनाने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जमा करावी. या मागणीसाठी येथे शिवसेना व युवा सेनेमार्फत २० रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शिवसेना कार्यालयापासून सकाळी ११.४५ वाजता पारोळा चौफुलीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. नंतर पारोळा चौफुलीवर २० मिनिटे रास्तारोको करण्यात येवून सभेत रुपांतर झाले.
मोर्चा व रास्तारोकोच्या वेळी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा दिल्याने सारा परिसर दणाणला होता. यावेळी काही वेळ वाहतुक विस्कळीत झाली होती.
माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकास पाटील, शिवसेना शहरप्रमुख मनोहर चौधरी आदींची मनोगत व्यक्त करताना शेतकºयांची व्यथा मांडली.
यावेळी तहसीलदार माधुरी आंधळे यांना शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी नगराध्यक्ष अतुल पाटील, उपनगराध्यक्ष वसीमबेग मिर्झा, पंचायत समितिचे सभापती रामकृष्ण पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील देशमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे.के.पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विलास पाटील, शहरप्रमुख मनोहर चौधरी, युवा सेना जिल्हाउपप्रमुख लखीचंद पाटील, शेतकरी सेना तालुकाप्रमुख अनिल पाटील, भीमसेना तालुकाप्रमुख राजू मोरे, स्वीकृत नगरसेवक प्रमोद पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास पाटील, संजय पाटील, जालिंंदर चित्ते, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पाटील, माजी शिवसेनाप्रमुख दीपक पाटील, जगन भोई, संतोष महाजन, कैलास पाटील, नेहरू पाटील, राहुल पाटील, प्रताप परदेशी, सुनील गोकल, माधवराव पाटील, प्रदीप महाजन, सुनील चौधरी, नीलेश पाटील, विनोद पाटील, योगेश पाटील, शेख कदीर, राजू शेख, फिरोजखान, खलील शेख, नासीरखान यांच्यासह शिवसेना, युवासेना व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनस्थळी गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख ठेवला.