भगव्या सप्ताहांतर्गत जळगाव जिल्हा बँकेविरूद्ध शिवसेनेचा मोर्चा
By admin | Published: May 13, 2017 06:17 PM2017-05-13T18:17:54+5:302017-05-13T18:17:54+5:30
जिल्हा बँकेकडून शेतक:यांना कर्ज मिळत नाही, किसान क्रेडीट कार्ड दिले जात आहेत.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 13 - शेतक:याची आर्थिक कोंडी झाली आहे. कजर्माफीचा मुद्दा प्रलंबित आहे. शिवसेना सत्तेत असली तरी कजर्माफीसाठी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी शिवसेनेची आहे. अशातच जिल्हा बँकेकडून शेतक:यांना कर्ज मिळत नाही, किसान क्रेडीट कार्ड दिले जात आहेत. त्यामुळे या प्रश्नी 30 मे ते 5 जून यादरम्यान मोर्चा काढला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
शिवसेनेचा भगवा सप्ताह 30 मे ते 5 जून म्हणजेच अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीपासून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसार्पयत साजरा केला जाईल. या अंतर्गत शेतक:यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यांच्यासाठी लढा उभारला जाईल.
19 मे रोजी नाशिक येथे शेतकरी अधिवेशन
भगवा सप्ताह साजरा करण्यापूर्वी 19 मे रोजी नाशिक येथे शेतकरी अधिवेशन होईल. त्यात जिल्हाभरातील अधिकाधिक शेतक:यांना सहभागी करून घेतले जाईल. या अधिवेशनात सेनेचा कुठलाही नेता भाषण करणार नाही किंवा बोलणार नाही. शेतकरी आपली व्यथा मांडतील. सकाळी 10 ते सायंकाळी 5 र्पयत हे अधिवेशन असेल. शेवटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपली शेतक:यांचे प्रश्न, कजर्माफी यासंबंधीची आपली भूमिका मांडतील, असेही वाघ यांनी सांगितले.