खड्डे दुरुस्तीसाठी बेशर्मीचे झाड लावून शिवसेनेचे गांधीगिरी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 04:26 PM2019-05-04T16:26:58+5:302019-05-04T16:28:06+5:30

खड्डे दुरुस्तीसाठी बेशर्मीचे झाड लावून शिवसेनेने गांधीगिरी करीत आंदोलन केले. या आंदोलनास काँग्रेसनेही समर्थन दिले.

Shivsena's Gandhigiri movement by shamelessly cutting trees | खड्डे दुरुस्तीसाठी बेशर्मीचे झाड लावून शिवसेनेचे गांधीगिरी आंदोलन

खड्डे दुरुस्तीसाठी बेशर्मीचे झाड लावून शिवसेनेचे गांधीगिरी आंदोलन

Next
ठळक मुद्देकाँग्रेसनेही दिले समर्थनविविध स्तरावरील कार्यकर्त्यांची हजेरी

मुक्ताईनगर, जि.जळगाव : खड्डे दुरुस्तीसाठी बेशर्मीचे झाड लावून शिवसेनेने गांधीगिरी करीत आंदोलन केले. या आंदोलनास काँग्रेसनेही समर्थन दिले.
येथील प्रवर्तन चौकात ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे पाईपलाईन लिकेज दुरुस्त करताना खोदलेला खड्डा तात्पुरत्या स्वरूपात जेसीबीने जेमतेम माती ढकलण्यात आली होती. ही माती काही अवजड वाहनांमुळे दबली गेली. अनेक अवजड व प्रवासी वाहने यात फसण्याचे प्रकार घडलेले आहेत, तर काही वाहने उलटण्याच्या परिस्थितीत होते. या ठिकाणी अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभाग तसेच नगरपंचायत प्रशासन यांना निवेदन व सूचना देऊनही दीड महिना उलटल्यावरही संबंधित विभागातर्फे टोलवाटोलवी व हलगर्जीपणा करीत आहे. मात्र हा खड्डा एखाद्या जीवघेणा अपघाताला आमंत्रण देऊ शकतो यासाठी शिवसेनेने आक्रमक होत येथे बेशर्मीचे झाड लावून गांधीगिरी आंदोलन केले व येत्या आठ दिवसात जर हा खड्डा पूर्ववत न झाल्यास आणखी प्रचंड आंदोलन करण्याची इशारा देण्यात आला आहे. तसेच आंदोलनस्थळी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांना पुष्पहार घालून बेशर्मीचे झाडही भेट देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई, अ‍ॅड.मनोहर खैरनार, गोपाळ सोनवणे, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, उपतालुका प्रमुख बाळा भालशंकर, राजेंद्र तळेले, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, माजी सरपंच रामभाऊ पुनासे, जाफर अली, सलीम खान, जहीर शेख, शकुर जमदार, तालुका संघटक प्रवीण चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक संतोष मराठे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, युवासेना तालुकाप्रमुख पंकज राणे, संतोष माळी, दीपक खुळे, आकाश सापधरे, चेतन पाटील, किरण कोळी, स्वप्नील श्रीखंडे, अमोल भोई, शुभम तळेले, योगेश पाटील, राजू पाटील वढवा आदी शिवसैनिक उपस्थित होते.
आंदोलन सुरू असताना कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील गाडीतून उतरून आंदोलनात सहभागी झाले होते. तज्ज्ञांमार्फत हा खड्डा न बुजता मजुरांकडून लिकेज जोडण्याचे काम केले जाते. त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून या ठिकाणी ही समस्या दर महिन्याला निर्माण होतम, असे सांगत डॉ.जगदीश पाटील यांनी शिवसेनेने नागरी समस्येकरिता केलेल्या आंदोलनाला कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचे सांगितले.


 

Web Title: Shivsena's Gandhigiri movement by shamelessly cutting trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.