खान्देशात शॉक लागून तीन जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 10:50 PM2017-09-21T22:50:17+5:302017-09-21T22:55:04+5:30

धरणगाव/ धुळे : खान्देशात गुरुवारी शॉक लागल्याच्या दोन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. यात उखळवाडी ता. धरणगाव येथील बाप- लेकाचा आणि बेटावद ता. शिंदखेडा येथे पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे. पहिली घटना गुरुवारी दुपारी तर दुसरी घटना सायंकाळी घडली.

Shock in Khandesh killed three people | खान्देशात शॉक लागून तीन जणांचा मृत्यू

खान्देशात शॉक लागून तीन जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देरानडुक्करांनी पिकाचे नुकसान करू नये म्हणून बांधावर बांधले होते तारबाप-लेकांचा जागीच मृत्यू बाप- लेकांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

आॅनलाई लोकमत
धरणगाव/ धुळे : खान्देशात गुरुवारी शॉक लागल्याच्या दोन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. यात उखळवाडी ता. धरणगाव येथील बाप- लेकाचा आणि बेटावद ता. शिंदखेडा येथे पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे. पहिली घटना गुरुवारी दुपारी तर दुसरी घटना सायंकाळी घडली.
सुरेश संपत पाटील (५२) व समाधान सुरेश पाटील (वय २७, रा. उखळवाडी ता. धरणगाव) अशी या मृत बाप- लेकांची नावे आहेत. पाटील यांनी त्यांच्या शेतात भुईमूग टाकला होता. रानडुक्करांनी या पिकाचे नुकसान करू नये म्हणून त्यांनी बांधावर तार बांधले होते. शेताजवळ असलेल्या इलेक्ट्रीक डी.पी.ला दिलेला ताणामुळे या तारांमध्ये विद्युत प्रवाह उतरला. या तारेचा सुरेश पाटील यांना शॉक लागला व तेथे ते चिटकले. जवळच काम करीत असलेला त्यांचा मुलगा समाधान याने ही घटना पाहताच वडिलाना सोडवायला गेला असता तोही तेथे चिटकला.
ही घटना पाहून विधवा सून सुरेखा मनोहर पाटील (२५) ही धावत आली आणि जोरात फेकली गेली त्यात ती गंभीर झाली. यात बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला. आजुबाजूच्या शेतकºयांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तेव्हा बाप-लेकांचा मृत्यू झाला होता. सुरेखा हिला जळगाव येथे तातडीने हलविले असून तिच्यावर उपचार सुरू आहे. २१ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बाप- लेकांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
बालकाचा मृत्यू
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ हायमास्ट लाईटच्या खांबाजवळ लहान मुले खेळत होती. गौरेश सुनिल देशमुख (वय ५) याचा हात लोखंडी खांबाला लागला. यात विजेचा धक्का लागून तो खाली पडला. त्याला तातडीने उपचारासाठी बेटावद येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: Shock in Khandesh killed three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.