शॉक लागून बैलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 08:53 PM2019-06-27T20:53:36+5:302019-06-27T21:52:20+5:30
नाचनखेडा येथील घटना
पाळधी ता जामनेर-येथून जवळच असलेल्या नाचनखेडा येथील शेतमजूर बिस्मिल्ला देशमुख यांच्या बैलाचा गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान शॉक लागून मृत्यू झाला.
याबाबत वृत्त असे की, बिस्मिल्ला देशमुख हे भाड्याने शेती करतात व दुसऱ्याच्या शेतात बैलजोडी घेऊन रोजंदारीवर काम करतात. गुरुवारी ते सुबान गफ्फार पटेल या शेतकºयाच्या शेतात कोळपणीसाठी गेले होते. बैलजोडीने त्यांच्या शेतामध्ये काम करत असताना शेतामध्ये असलेल्या विजेच्या डीपीला ताण दिलेल्या तारेत विजेचा प्रवाह सुरु होता. हे या शेतकºयाच्या लक्षात आले नाही व बैलाचा या तारेस स्पर्श झाल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा बैल व शेतकरी बालबाल बचावले. सदर घटनेची माहिती मिळाली असता वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला.
सदर शेतकरी अत्यंत गरीब असून त्याने दुसºयाकडून उसने पैसे घेऊन बैल विकत घेतले आहे. ऐन शेती कामाच्या वेळेत त्यांच्या बैलाचे नुकसान झाल्याने व आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकº्याने व्यक्त केली.