वाकोदच्या गुरांच्या बाजारात शुकशुकाट
By admin | Published: June 3, 2017 02:10 PM2017-06-03T14:10:06+5:302017-06-03T14:10:06+5:30
काही भागात प्रसिद्ध असलेल्या वाकोद आठवडे बाजारात केवळ
ऑनलाईन लोकमत
वाकोद, जि. जळगाव, दि. 3 - शेतक:यांनी पुकारलेल्या संपामुळे भाजीपाल्याच्या आवकवर मोठा परिणाम होऊन जामनेर तालुक्यासह मराठवाडय़ाच्या काही भागात प्रसिद्ध असलेल्या वाकोद आठवडे बाजारात केवळ 25 ते 30 टक्केच भाजीपाला आला. मालाची आवक कमी झाल्याने भाव गगणाला भिडले असून 10 रुपये प्रति किलो असणारे लाल टमाटय़ाचे भाव सहापटीने वाढून ते 60 रुपये किलोवर पोहचले. हिरवी मिरचीदेखील 70 ते 75 रुपये किलोवर पोहचली आहे. दरम्यान, या बाजारात अनेक ठिकाणाहून येणा:या भाजीपाल्याची आवक अतिशय अल्प प्रमाणात झाल्याने हा बाजार पूर्णत: कोलमडला. रात्री शेतकरी संपा बाबत तोडगा निघाला असला तरी याचा परिणाम या बजारासह ग्रामीण भागात दिसून आला. गुरांच्या बाजारातही शुकशुकाट होता.
भाजीपाल्याच्या दरांमध्ये दुप्पटच्या वर वाढ झाली आहे. गगणाला भिडलेले भाव पाहून काही नागरिक खरेदी विना माघारी परतल्याने बाजारातही शुकशुकाट दिसून आला.
खान्देशात प्रसिद्ध असलेला वाकोदच्या बैल बाजारातही आज शुकशुकाट पहायला मिळाला. या बजाराकडे पाठ फिरविल्याचे सांगितले जात होते.