धक्कादायक..फळ्यावर उत्तरे लिहून दिली जातेय संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 09:55 PM2017-11-10T21:55:01+5:302017-11-10T21:55:45+5:30
महाराष्ट राज्य विद्या प्राधिकरण पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेची उत्तरे चक्कशिक्षकांकडूनच वर्गातील फळ्यावर लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये सुरु असल्याच ेआहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव-दि.१०-महाराष्ट राज्य विद्या प्राधिकरण पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेची उत्तरे चक्कशिक्षकांकडूनच वर्गातील फळ्यावर लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये सुरु असल्याच ेआहे.
शाळेच्या निकालावरुन गुणवत्ता सिद्ध होणार असल्याने हा‘उद्योग’सुरु आहे. त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याची नाराजी सुज्ञ नागरिकाकडून व्यक्त होत आहे.
८ नोव्हेंबरपासून या परीक्षा घेण्यात येत असून, जिल्'ातील५ लाख ६२ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यासाठी विद्यार्थी प्राधिकरणाकडून जिल्'ातील प्रत्येक शाळेत परीक्षेआधी प्रश्नपत्रिका पोहचविण्यात आल्या होत्या. मात्र परीक्षा सुरु झाल्यानंतर काही शाळांमध्ये शिक्षक सर्व उत्तरे थेट फळ्यावर लिहून देतआहेत. प्रगत शैक्षणिक अभ्यासक्रमाव्दारे विद्यार्थ्यांना प्रगत बनविण्याचे धोरण शासनाने अवलंबिले असताना एकीकडे विद्यार्थ्यांना सर्व उत्तरे लिहूनदिली जात असल्याने संकलित चाचणी परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
विद्यार्थ्यांना ७० टक्के गुण मिळविणे आवश्यक
संकलित चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांना ७० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. शाळेच्या निकालावरुन शाळेची गुणवत्ता सिध्द होणार असल्याने, विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे शिक्षकांकडून दिली जात आहे. शाळेची गुणवत्ता कशाप्रकारे कायम राहिल यासाठीच शिक्षकांचा खटाटोप सुरु आहे. तसेच अनेक शिक्षकांना संकलित चाचणीबाबतचे मूल्यांकन कसे राहिल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे थेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका शिक्षकांकडूनच सोडविल्या जात आहेत.
सोयीनुसार घेतल्या जात आहेत परीक्षा
८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान या परीक्षा घेतल्या जात आहेत. परीक्षांसाठी सकाळी ११ ते दुपारी१ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र अनेक शाळांमध्ये या परीक्षा आपल्या सोयीनुसार घेतल्या जात आहेत. काही शाळांमध्ये या परीक्षा सकाळी ७.३० वाजता तर काही शाळांमध्ये दुपारी १२ वाजता देखील घेतल्या जात आहेत. मात्र याबाबत शिक्षण विभागाचे कुठलेही नियंत्रण दिसून येत नाही. शिक्षण विभागाकडून संपर्क अधिकाºयांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीकडून देखील कोणतीही कारवाई याबाबत होताना दिसत नाही.
प्रश्नपत्रिका पोहचविण्यासही आकारले पैसे
गेल्या आठ दिवसांपूर्वी संकलित कल चाचणीच्या प्रश्नपत्रिका या जि.प.शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. तर या ठिकाणाहून सर्व तालुक्याचा ठिकाणी प्रश्नपत्रिका पोहचविण्यात आल्या. शाळांपर्यंत या प्रश्नपत्रिका पोहचविण्यासाठी मुख्याध्यापकांकडून २०० ते ५०० रुपये घेण्यात आल्याची माहिती काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी दिली. ज्या उद्देशासाठी संकलित चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. तो उद्देश साध्य होताना दिसत नाही.
कोट
संकलित कल चाचणी परीक्षा सुरळीत व पारदर्शक पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाकडून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. शाळांमध्ये भेटी देखील देण्यात आल्या. मात्र जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत फळ्यावर उत्तरे लिहिली जात असल्याचे आढळून आलेले नाही.
-बी.जे.पाटील,शिक्षणाधिकारी, जि.प.प्राथमिक विभाग