धक्कादायक, भातामध्ये निघाल्या चक्क अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:52 PM2020-08-11T12:52:06+5:302020-08-11T12:52:38+5:30
अभियांत्रिकी कोविड केअर सेंटरमधील प्रकार : ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
जळगाव : शनिवारी रात्री शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रूग्णांना शिळे जेवण दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सोमवारी दुपारी पुन्हा येथील कोविड सेंटर रुग्णांच्या ताटात भातामध्ये चक्क अळ्या निघाल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे संतप्त रुग्णांनी नगरसेवकांकडे तक्रार करून या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकाराबद्दल महापौर भारती सोनवणेयांनी रुग्णांशी चर्चा करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
गेल्या आठवड्यात याच ठिकाणच्या कोविड सेंटरमधील सोयी-सुविधांबाबत रुग्णांकडून तक्रारी करण्यात आल्याने नगरसेवकांनी या सेंटरची पाहणी करून अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या होत्या. यावेळी नगरसेवकांनी रुग्णांनी केलेल्या निकृष्ठ जेवणाबद्दल मनपा प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या प्रकारामुळे मनपाने भोजनाच्या ठेक्यासाठी निविदा काढून प्रस्ताव मागविले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास शासकीय अभियांत्रिकीच्या कोविड कक्षामध्ये पुन्हा रुग्णांना निकृष्ठ जेवण देण्यात आले. रात्रीच्या जेवणामध्ये दुपारच्याच पोळ्या आणि भात देण्यात आल्याचा प्रकार घडला. या रुग्णांनी जेवणावर बहिष्कार टाकून एकच गोंधळ घातला होता.
सोमवारी भातामध्ये निघाल्या चक्क अळ््या
शनिवारी रात्री शिळे जेवण दिल्यानंतर व सोमवारी दुपारी मक्तेदाराने निकृष्ठ जेवणाचा कळसच गाठला. येथील कोविड सेंटरच्या (सी २) या इमारतीमध्ये एका रुग्णाला त्याच्या भातामध्ये चक्क अळ््या आढळल्या.
यामुळे एकच गोंधळ उडाला. हा प्रकार रुग्णांनी थेट मनपा आयुक्तांसह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सांगितला. तसेच सोशल मीडियावर याचे फोटो काढून व्हायरल केले. या धक्कादायक प्रकारामुळे कोविड सेंटरमधील जेवणाच्या दर्जाबाबत सर्वत्र संतापाची लाट उसळली असून अनेक रुग्णांनी येथील जेवण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा प्रकार समजल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे तक्रार करून संबंधित मक्तेदाराचा ठेका रद्द करून बिले थांबिण्याची मागणी केली आहे. तसेच रुग्णांच्या जिवाशी खेळून निकृष्ठ जेवण पुरविल्या प्रकरणी मक्तेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली आहे.
सत्ताधाऱ्यांसह मनपा प्रशासनच जबाबदार
भातामध्ये अळ््या निघण्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून या जेवणाच्या ठेक्यामध्ये सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचे हात बरबटले आहेत. रुग्णांच्या जिवाशी यांना काहीही घेणे-देणे नसून या ठेक्यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. निकृष्ठ जेवणासंदर्भात व तेथील सोयी सुविधांबाबत अनेकदा तक्रारी येऊनही कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
रुग्णांना चांगल्या सुविधा न देता, त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळजा जात असून या प्रकाराला सत्ताधाºयांसह मनपा प्रशासनचं जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला आहे. या संदर्भात शिवसेनेच्यावतीने येत्या महासभेत जाब विचारणार असल्याचेही सुनील महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
रुग्णांना रात्रभर रहावे लागले उपाशी
निकृष्ठ जेवणांमुळे रुग्णांनी जेवणावर बहिष्कार टाकल्याने नगरसेवक कैलास सोनवणे रात्री साडेदहा वाजता मनपाच्या काही डॉक्टरांना सोबत घेऊन येथील कोविड सेंटरमध्ये गेले. यावेळी रुग्णांनी सोनवणे यांच्याकडे मक्तेदाराकडून देण्यात येणाºया शिळ््या जेवणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. सोनवणे यांनी यावेळी मनपा आयुक्तांशी संपर्क साधून या प्रकाराबद्दल मक्तेदारावर ठेका रद्द करून बिले थांबविण्याची मागणी केली. सुमारे एक तास रुग्णांनी या ठिकाणी संताप केला. आयुक्तांकडे तक्रार करूनही, मक्तेदाराकडून दुसरे जेवण उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे रुग्णांना उपाशीच झोपावे लागले.
भातामध्ये अळ््या आढळून आल्याची तक्रार माझ्यापर्यंत आली. ही चूक मक्तेदाराने मान्य केली आहे. असा प्रकार पुन्हा होऊ नये याबाबत संबंधित मक्तेदाराला कडक सूचना केल्या आहेत. पुन्हा असा प्रकार घडल्यावर प्रशासनातर्फे त्याच्या कडक कारवाई करण्यात येईल.
-सतीश कुलकर्णी, आयुक्त मनपा.
मक्तेदाराने रुग्णांना निकृष्ठ जेवण देणे सुरू केले असून, त्यांचे बिले थांबवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
- कैलास सोनवणे, नगरसेवक