धक्कादायक ! जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट ; एकाच दिवसात प्रथमच आढळले २०९ कोरोना बाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 08:11 PM2020-07-03T20:11:03+5:302020-07-03T20:11:13+5:30
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबता थांबत नसून दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या ही वाढत आहे.शुक्रवारी तर ...
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबता थांबत नसून दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या ही वाढत आहे.शुक्रवारी तर कोरोनाचा विस्फोटच झाला़ तब्बल एका दिवसात २०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर ५५, जळगाव ग्रामीण १३, अमळनेर ०८, भुसावळ १८, भडगाव १३, बोदवड ०१, चाळीसगाव ०४, चोपडा ११, धरणगाव ०६, एरंडोल २८, जामनेर ०७, मुक्ताईनगर ०१, पाचोरा ०१, पारोळा २२, रावेर १०, यावल ११, रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४ हजार ०७ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.