धक्कादायक : विहिरीत पोहण्यासाठी गेले म्हणून मातंग समाजाच्या दोन तरुणांची नग्नावस्थेत धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:08 PM2018-06-14T13:08:22+5:302018-06-14T13:08:22+5:30

जामनेर तालुक्यातील वाकडी येथील घटना

Shocking: Dhind, two youths of Matang community, went to swimming in the well | धक्कादायक : विहिरीत पोहण्यासाठी गेले म्हणून मातंग समाजाच्या दोन तरुणांची नग्नावस्थेत धिंड

धक्कादायक : विहिरीत पोहण्यासाठी गेले म्हणून मातंग समाजाच्या दोन तरुणांची नग्नावस्थेत धिंड

Next
ठळक मुद्देदोघांना अटकसोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पहूर, जि. जळगाव - विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले म्हणून सचिन चांदणे व राहुल चांदणे (रा. वाकडी, ता. जामनेर) या मातंग समाजाच्या दोघं तरुणांना नग्न करून मारहाण करीत त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील वाकडी येथे रविवारी घडला. या प्रकरणी ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांविरुद्ध बुधवारी रात्री अटक करण्यात आली.
या संदर्भात दुर्गाबाई सांडू चांदणे यांनी बुधवारी रात्री पहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवार, १० जून रोजी सचिन चांदणे व राहुल चांदणे हे दोघे चुलत भाऊ वाकडी गावातील कर्णफाट्यानजीक असलेल्या ईश्वर जोशी यांच्या मालकिच्या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. त्या वेळी ईश्वर जोशी यांच्यासह प्रल्हाद लोहार यांनी या दोघ चुलत भावांना नग्न करीत जबर मारहाण केली. तसेच त्यांची त्याच अवस्थेत धिंड काढून धमकी दिली.
रविवारी हा प्रकार घडल्यानंतर गावातच तो मिटविण्याचा प्रयत्न झाला. मात्र या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर याची वाच्यता झाली व बुधवारी रात्री या प्रकरणी सचिन चांदणे याची आई दुर्गाबाई चांदणे यांनी पहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ईश्वर जोशी व प्रल्हाद लोहार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात जातीच्या माध्यमातून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटना घडत आहेत. वाकडीची ही घटना समाजसुधारकांचा वारसा आणि संविधानाचा आरसा डावलणाऱ्या आहेत. त्यामुळे नव्याने झालेल्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे प्रबोधन आणि अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. संविधानाने दिलेला सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी बºयाच अंगाने प्रयत्न करावे लागणार आहे. हे वाकडी येथील घटनेने समोर आले आहे. या प्रकारात आम्ही निषेध करीत आहोत.
- अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष, अंनिस.

Web Title: Shocking: Dhind, two youths of Matang community, went to swimming in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.