धक्कादायक ! जळगावात आत्महत्याग्रस्त शेतकरी वारसाच्या फसवणुकीचा प्रयत्न
By Admin | Published: April 18, 2017 05:07 PM2017-04-18T17:07:58+5:302017-04-18T17:07:58+5:30
आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या वारसांनी दाखल केलेल्या मदतीच्या प्रस्तावासाठी पैसे मागत फसवणूक करण्याचा प्रयत्न मंगळवारी उघड झाला.
जळगाव,दि.18- जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी असल्याची बतावणी करून तुमचा आत्महत्त्याग्रस्तासाठी दाखल मदतीच्या प्रस्तावाच्या अनुदानाचा धनादेश कार्यालयाकडे परत आला आह़े त्यामुळे दंडाची रक्कम भरून धनादेश घेवून जा़ अशा प्रकारे चाळीसगाव येथील शेतकरी वारस महिलेची फसवूणक झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आह़े वारसदार महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील अधिका:यांनी भेट घेतली तसेच याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती मिळाली आह़े
राजेंद्र महादू चव्हाण रा़ चाळीसगाव, यांची चाळीसगाव तालुक्यातील नागद रोड येथे शेती होती़ त्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आह़े शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या वारसांना मदत स्वरुपात रक्कम दिली जाते. त्यानुसार चव्हाण यांचे वारसदार म्हणून त्यांची पत्नी मुक्ताबाई चव्हाण यांनी चाळीसगाव तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकरण सादर केले होते.