धक्कादायक...१२ लाखांच्या विम्याच्या रकमेसाठी केला पतीचा मृत्यूचा बनावट दाखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 08:04 PM2017-12-22T20:04:26+5:302017-12-22T20:07:17+5:30

गलवाडे येथील महिलेसह पुण्याच्या विमाप्रतिनिधी विरूद्ध गुन्हा दाखल

Shocking: Letter of husband's death for a sum insured of Rs. 12 lakhs | धक्कादायक...१२ लाखांच्या विम्याच्या रकमेसाठी केला पतीचा मृत्यूचा बनावट दाखला

धक्कादायक...१२ लाखांच्या विम्याच्या रकमेसाठी केला पतीचा मृत्यूचा बनावट दाखला

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ लाखांच्या विम्याच्या रकमेसाठी दिला पतीच्या मृत्यूचा बनावट दाखलाचौकशी दरम्यान विमा कंपनीच्या अधिकाºयाच्या लक्षात आला प्रकारमहिलेसह विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा

आॅनलाईन लोकमत
अमळनेर- विम्याची १२ लाख रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी चक्क पती मयत झाल्याचा खोटा दाखला सादर करणाºया गलवाडे येथील महिलेसह पुणे येथील विमा प्रतिनिधीविरूध्द मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील गलवाडे येथील सुरेखा पुनमचंद भिल या महिलेने पी.एन.बी.मेंट लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून पती पुनमचंद कहारु भिल यांचा पुणे येथील विमा प्रतिनिधी योगेश्वर गणपतराव उमाप यांच्यामार्फत १२ लाखांचा विमा काढला होता. महिलेने १ आॅक्टोबर २०१५ रोजी ग्रामपंचायतीकडून पतीचा बनावट मृत्यू दाखला मिळविला. त्यानंतर हा दाखला व विमा पॉलिसी (क्रमांक 21424333 ) कार्यालयात सादर केले. त्यानंतर विमा कंपनीने प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. २२ मार्च २०१७ रोजी या महिलेचा पती जीवंत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी पी.एन.बी. मेंट लाईफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक अनिल विष्णू वानखेडे यांनी मारवड पोलिसात फिर्याद दिल्याने दोघांविरूद्ध भादवी ४०६, ४०९, ४१७, ४२०, ४६८, ४६९, ४७१, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार जयवंत पाटील करीत आहेत.

Web Title: Shocking: Letter of husband's death for a sum insured of Rs. 12 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.