जळगाव जिल्हा बँकेत धक्कादायक निकाल, पाटील 1 मताने पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 10:45 AM2021-11-22T10:45:57+5:302021-11-22T10:46:05+5:30
एकूण ५४ पैकी तीन मते बाद ठरली. जनाबाई महाजन यांना २६ तर माजी आमदार अरुण पाटील यांना २५ मते मिळाली आहेत.
जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रावेरला विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला. रा. काँचे नेते आणि अपक्ष उमेदवार तथा माजी आमदार अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन ह्या अवघ्या एक मताने विजयी झाल्या.
एकूण ५४ पैकी तीन मते बाद ठरली. जनाबाई महाजन यांना २६ तर माजी आमदार अरुण पाटील यांना २५ मते मिळाली आहेत. त्यामुळे, या निकालानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच, जिल्हा बँक निवडणुकीत अरुण पाटील यांचा पराभव झाल्याने नेमकं काय गौडबंगाल झालं याचीच चर्चा होत आहे. जळगाव जिल्हा बँकेसाठीच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून 11 जागा बिनविरोध काढण्यात आल्या आहेत. उर्वरीत 10 जागांपैकी एका जागेचा निकाल हाती आला असून हा निकाल पाहता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे, पुढील 9 जागांच्या निकालाची उत्कंठा आणखी वाढली आहे.