वरणगावात रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे प्रवाशांसह दुकानदार हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:33+5:302021-08-12T04:21:33+5:30

वरणगाव : येथील बोदवड रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे प्रवाशांसह दुकानदार हैराण झाले आहेत. कोरोनामुळे येथे मंगळवारी भरणारा साप्ताहिक बाजार वर्दळ ...

Shopkeepers with passengers harassed due to street market in Varangaon | वरणगावात रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे प्रवाशांसह दुकानदार हैराण

वरणगावात रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे प्रवाशांसह दुकानदार हैराण

Next

वरणगाव : येथील बोदवड रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे प्रवाशांसह दुकानदार हैराण झाले आहेत. कोरोनामुळे येथे मंगळवारी भरणारा साप्ताहिक बाजार वर्दळ असलेल्या बोदवड रोडवर भरविला जात आहे. त्यामुळे वारंवार रस्ता जाम होत असून भांडणे होतात. त्यामुळे बाजार पूर्वीच्याच जागेवर भरविण्याची मागणी करण्यात आली आहे.

पूर्वीपासून वरणगावसह आजूबाजूच्या खेड्या-पाड्यातील जनतेसाठी दर मंगळवारी आठवडा बाजार रामपेठ भागात भोगावती नदीकाठी भरत असतो. परंतु कोरोनामुळे सर्व दुकानदार ‘व्यापारी’ भाजीपाला विक्रेते, खाद्यपदार्थांची दुकाने यासह सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते आपली दुकाने बस स्टॅंड परिसरात भरमसाठ रहदारी असलेल्या बोदवड रस्त्यावर थाटत आहेत.

याठिकाणी वरणगावसह परिसरातील नागरिक आठवड्याचा बाजार घेणारे नागरिक खरेदीसाठी एकत्र जमल्यामुळे या वर्दळीच्या रस्त्यावर पायी चालणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. तसेच वाहनांची सुरू असलेली वर्दळ व रस्त्यावरील खरेदी, विक्री करणाऱ्या ग्राहकांसह दुकानदारांची गर्दी यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, गर्दीमुळे येथे पोत चोरीचे प्रमाण वाढले आहे. मागच्या आठवड्यात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे लांबविली होती. तसेच येथील कायम रहिवासी असलेल्या दुकानदारांच्या घरांपुढे हातगाड्या लावण्यावरून एकमेकांना धक्काबुक्की करण्यासह वाद होतात. यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा पार फज्जा उडाला आहे. याविषयी बऱ्याचदा जनतेच्या मागणीवरून आवाज उठविला गेला, परंतु त्याकडे नगरपरिषदेसह संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. यात एखादेवेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बाजार पूर्ववत जागी भरविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Shopkeepers with passengers harassed due to street market in Varangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.