थोडक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:11+5:302020-12-15T04:33:11+5:30
जळगाव : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली आहे. पावसामुळे कमाल तापमानात घट झाली असली ...
जळगाव : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली आहे. पावसामुळे कमाल तापमानात घट झाली असली
तरी किमान तापमानात कोणतीही घट झालेली नाही. दरम्यान, १६पर्यंत जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहणार असून, १७नंतर जिल्ह्यात उत्तरेकडून येणारे थंड वारे पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, १७ नंतर जिल्ह्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे.
अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पुन्हा चिखल
जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून, मनपाने पावसाळ्यानंतरही रस्त्यांची दुरुस्ती केलेली नाही. आता पुन्हा अवकाळी
पाऊस सुरू झाल्याने शहरातील रस्त्यावर चिखल साचला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यांचा
प्रश्नावर मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केला जात आहे.
नगरसेविकेचा आंदोलनाचा इशारा
जळगाव : शहरातील ख्वॉजामीया चौकातील अतिक्रमणाबाबत मनपाकडे अनेकवेळा तक्रारी करूनदेखील मनपाने कोणतीही कारवाई केलेली नाही.
यामुळे भाजप नगरसेविका दीपमाला काळे यांनी १६ रोजी होणाऱ्या महासभेतच आंदोलन करण्याचा इशारा मनपा प्रशासनाला दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मनपाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही मनपाने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही.
वॉटरग्रेसप्रकरणी बँकेला नोटीस
जळगाव : शहराची दैनंदिन सफाई करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याची चर्चा आहे. वॉटरग्रेसने याबाबतचा करारनामा युनियन बँकेकडे सादर केला असल्याने मनपाने आता युनियन बँकेला नोटीस बजावून याबाबतचा खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सात दिवसांत हा खुलासा सादर करण्याचे आदेश मनपाने दिले आहे.
गाळे प्रश्न पुन्हा रखडला
जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा विषय पुन्हा रखडला आहे. ज्या गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली आहे. त्या गाळेधारकांना नूतनीकरण करून देण्याबाबत सत्ताधारी आग्रही
आहेत. तसेच याबाबतचा प्रस्ताव महासभेत आणण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली होती. मात्र, १६ रोजी होणाऱ्या महासभेत शासकीय व अशासकीय विषयांमध्ये गाळेधारकांचा विषय नसल्याने हा विषय पुन्हा रखडला असल्याचे बोलले जात आहे.