कजगाव शिवारात शाॅर्टसर्किटने आग; तीन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 23:06 IST2021-04-27T23:06:10+5:302021-04-27T23:06:45+5:30
कजगाव शिवारातील वीज वितरण कार्यालयालगत असलेल्या शेतात शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन लाखांचे नुकसान झाले.

कजगाव शिवारात शाॅर्टसर्किटने आग; तीन लाखांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
कजगाव, ता. भडगाव : येथील इंद्रसिंग चंद्रसिंग पाटील यांच्या कजगाव शिवारातील वीज वितरण कार्यालयालगत असलेल्या शेतात शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन बिघ्यातील मका व ठिंबक सिंचनच्या नळ्या असा अडीच ते तीन लाख रुपयांचा माल जळून खाक झाला.
येथील रहिवासी इंद्रसिंग चंद्रसिंग पाटील यांची कजगाव शिवारात कजगाव -भडगाव मार्गावरील वीज वितरण उपकेंद्राच्या बाजूला शेती आहे. तीन बिघ्यातील मका कापून थप्पी मारलेला होता. मका काढणारे मशीन मिळाल्यानंतर मका काढायचे होते. चारा मात्र उभाच होता. दि. २७ च्या दुपारी शार्टसर्किटमुळे अचानक आग लागून तीन बिघ्यातील मका कणसाची थप्पी, उभा चारा व तीन बिघे क्षेत्रातील पूर्ण ठिंबकच्या नळ्या जळून खाक झाल्या.
चारा व मका कोरडा असल्याने काही मिनिटांत जळून खाक झाला. यामुळे इंद्रसिंग पाटील यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले. याबाबत तलाठी कार्यालयात कळविण्यात आले आहे.