विमा योजनांवरून बँकांचाच सावळा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2017 01:03 AM2017-06-03T01:03:24+5:302017-06-03T01:03:24+5:30
लोकमत सव्रेक्षण : पंतप्रधान जीवन सुरक्षा, जीवनज्योती विमा योजनांबाबत बँक कर्मचारीच अनभिज्ञ
धुळे : केंद्र सरकारने 2015 मध्ये कार्यान्वित केलेल्या पंतप्रधान जीवन सुरक्षा विमा योजना व पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेबाबत बँकांमध्ये असलेला सावळा गोंधळ ‘लोकमत’ सव्रेक्षणात गुरुवारी दिसून आला़ सदर योजनांबाबत बँक कर्मचारीच अनभिज्ञ असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आह़े
केंद्र सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना जाहीर केल्या असून या योजनांचा लाभ अनेक लाभार्थीनी विविध बँकांच्या माध्यमातून घेतला आह़े त्यानुसार या योजनेत सहभागी लाभार्थीच्या खात्यातून योजनांच्या हप्त्याची रक्कम अनुक्रमे 12 व 330 रुपये कपात करण्यात आले आहेत़ मात्र प्रसंग उद्भवल्यास या विम्याचा लाभ कसा मिळेल, कुणाशी व कसा संपर्क कसा करायचा, क्लेम कसा व कुठे मिळणार, या विमा पॉलिसीचा नंबर काय, कंपनी कोणती, या प्रश्नांचे उत्तर मिळविण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने गुरुवारी दुपारी 12 ते 1 या वेळेत शहरातील सहा बँकांमध्ये ग्राहक म्हणून जाऊन या योजनांबाबत विचारणा केली असता अधिकारी, कर्मचा:यांकडून मिळालेली उत्तरे पुढीलप्रमाण़े़़
अशा आहेत योजना़़
पंतप्रधान जीवन सुरक्षा विमा योजना व जीवनज्योती विमा योजना या दोन्ही योजनांची सुरुवात फेब्रुवारी 2015 मध्ये झाली आह़े जीवन सुरक्षा योजनेसाठी वयाची अट 18 ते 70 वर्षे असून 12 रुपयांचा वार्षिक हप्ता भरल्यानंतर लाभार्थीचा 2 लाख रुपयांचा विमा असणार आह़े लाभार्थीचे निधन झाल्यास कुटुंबातील सदस्याला त्याचा लाभ मिळेल़ तर जीवनज्योती योजनेसाठी 18 ते 50 वर्षे वयोमर्यादा असून वार्षिक हप्ता 330 रुपयांचा आह़े निधन झाल्यास कुटुंबातील सदस्याला या योजनेचा लाभ मिळेल़ या योजनांबाबत धुळ्यात जागृती झाली नसल्याने लाभार्थीना त्याबाबत पुरेशी माहिती मिळत नाही़