रेमडेसिवीरचा निर्माण पातळीवरच तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:37+5:302021-04-11T04:15:37+5:30
जळगाव : रेमडेसिवीर औषधी निर्मात्या कंपन्याकडून होणारा औषधींचा पुरवठा व प्रत्यक्षात वापर यात निर्माण झालेली तफावत यामुळे ...
जळगाव : रेमडेसिवीर औषधी निर्मात्या कंपन्याकडून होणारा औषधींचा पुरवठा व प्रत्यक्षात वापर यात निर्माण झालेली तफावत यामुळे औषधीचा तुटवडा निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशांनुसारच रेमडेसिवीर औषधींचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
रेमडेसिवीर औषधी निर्मात्या कंपन्याकडून औषधीचा पुरवठा नियमितपणे होणेबाबत केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून प्रयत्न सुरू आहे. तर स्थानिक स्तरावरूनही जिल्हा प्रशासन नियमित रेमडेसिवीर औषधी निर्मात्या कंपन्यांच्या संपर्कात आहे.
मात्र खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी रेमडेसिवीर औषधींचा अनावश्यक वापर थांबवुन भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या निर्देशांनुसार आवश्यक रुग्णांनाच रेमडेसिवीर औषधी पुरवावे. प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.