शॉट सर्किटने मुडी येथील शेतकऱ्याचा ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 11:19 PM2021-02-09T23:19:55+5:302021-02-09T23:22:21+5:30
मुडी प्र. डांगरी येथील शेतकऱ्याचा मुडी गावाजवळ असलेल्या शेतातील शॉटसर्किट होऊन ३ एकर ऊस जळून खाक झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील शेतकऱ्याचा मुडी गावाजवळ असलेल्या शेतातील शॉट सर्किट होऊन ३ एकर ऊस जळून खाक झाला आहे. त्यात बियाण्यासाठी काढलेला ऊस जळाला आहे.
मुडी प्र. डांगरी येथील शेतकरी गावाजवळ असलेल्या प्रमोद माधवराव सुर्यवंशी यांची गट नं. ६२ शेतातील ऊस पिकावरुन हा शेतातून गेलेल्या वीज वाहिनीला झालेल्या शॉटसर्किटमुळे जळून खाक झाला. त्यात २५ ते ३० टन चे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत मुडी येथील तलाठी यांनी पंचनामा केला आहे. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनीदेखील पाहणी केली असून याबाबत पोलीस ठाण्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्याने तक्रार दिली आहे.