शिरपुरात वाहनांची तोडफोड

By admin | Published: February 22, 2016 12:42 AM2016-02-22T00:42:19+5:302016-02-22T00:42:19+5:30

पोलीस वाहनाचाही समावेश : 18 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

Shot of vehicles in Shirpur | शिरपुरात वाहनांची तोडफोड

शिरपुरात वाहनांची तोडफोड

Next

शिरपूर : शहरातील खालचे गाव व शीतल चौकात महिला आणि मुलींची छेड काढत असल्याप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांनी शनिवारी रात्री शहर पोलीस ठाण्यावर येऊन आरडाओरड केली आणि घराकडे परतताना पोलीस गाडीसह अन्य चार वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी 18 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आह़े

 

गेल्या सहा महिन्यांपासून या भागात महिला व मुलींची छेड काढण्याच्या तक्रारी होत्या.

याप्रकरणी पीएसआय जे.जी. महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंद उर्फ वावडय़ा दत्तात्रय पाटील, रा़बालाजी मंदिराजवळ, सचिन नाना शिरसाठ रा़पुंडलिकनगर, माया उर्फ महेश रमेश राठोड, मयूर ईशी, रा़खाटीक चौक, संजू पाटील, रा़भरतसिंगनगर, कमलेश चंदू कलाल, रा़पारधीपुरा, बापू कलाल, विनोद कलाल रा़पारधीपुरा, पप्पू धनराज बारी, सुरेश उत्तम महाजन रा़पारधीपुरा, भैया मराठे रा़मराठा गल्ली, गोलू मराठे रा़नारायणनगर, मयूर भोई, सागर दगडू पाटील रा़भरतसिंग नगर, सागर बापू थोरात रा़बौद्धवाडा, बाल्या मच्छिंद्र थोरात, आकाश व राहुल यांचे पूर्ण नाव माहीत नाही.

यांच्यासह 18 जणांविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 353, 332, 337, 504, 506 सह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

रॅलीत खुलेआम शस्त्रे

शिरपूरमध्ये शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी काढलेल्या मोटारसायकल रॅलीत तरुणांनी खुलेआम हातात शस्त्रे घेतल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी सुमारे 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिरपूर पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यान्वये ही कारवाई केली.

आठ जण ताब्यात

संशयितांपैकी आठ जणांना पोलिसांनी रविवारी सायंकाळर्पयत ताब्यात घेतले होते. शहरात सोमवारपासून श्री खंडेराव यात्रोत्सव प्रारंभ होत आहे. त्यामुळे शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

एक संशयित जखमी

दरम्यान, संशयितांपैकी आनंद उर्फ वावडय़ा दत्तात्रय पाटील हा जखमी असून त्याच्यावर धुळ्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Web Title: Shot of vehicles in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.