भुसावळच्या धान्य दुकानदारास कारणे दाखवा नोटीस, 234 गोण्या धान्य असलेला ट्रक नशिराबाद पोलीस ठाण्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:31 PM2017-11-17T12:31:41+5:302017-11-17T12:32:22+5:30

काळ्या बाजारात धान्य विक्री संशयाचे प्रकरण

Show cause notice to Bhusawal grain shop owner | भुसावळच्या धान्य दुकानदारास कारणे दाखवा नोटीस, 234 गोण्या धान्य असलेला ट्रक नशिराबाद पोलीस ठाण्यातच

भुसावळच्या धान्य दुकानदारास कारणे दाखवा नोटीस, 234 गोण्या धान्य असलेला ट्रक नशिराबाद पोलीस ठाण्यातच

Next
ठळक मुद्देसंशयावरून नशिराबाद टोलनाक्याजवळ पकडलेपोलिसात व जिल्हाधिका-यांना दिली माहिती

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17 - धान्याने भरलेले ट्रक काळ्या बाजारात विक्रीस जात असल्याच्या संशयावरून नशिराबाद टोलनाक्याजवळ पकडलेले ट्रक 15 दिवसांपासून नशिराबाद पोलीस ठाण्यातच जमा असून या प्रकरणी भुसावळ येथील स्वस्त धान्य दुकानदारास जिल्हा पुरवठा अधिका:यांनी कारणे दाखवा नोटील बजावली आहे. 
31 ऑक्टोबर रोजी भुसावळहून जळगावकडे भरधाव वेगात जाणा:या ट्रक (एमएच-19 ङोड-3817) व मालट्रक (एमएच-05 4122) या वाहनांमधून गहू, तांदूळ  धान्याचा साठा काळ्या बाजारात जात असल्याचा संशय भुसावळचे नगरसेवक तथा आरपीआयचे अध्यक्ष राजू सूर्यवंशी यांना आला होता. त्या वेळी  त्यांनी वाहनचालकांना हटकले असता त्यांची उत्तरे संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसात व जिल्हाधिका-यांना माहिती दिली. त्यानंतर जळगावचे तहसीलदार अमोल निकम व भुसावळचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, तपासणी पुरवठा अधिकारी आर.एल.राठोड, सपोनि दीपक गांधले, उपनिरीक्षक अशोक खरात आदींनी याबाबत चौकशी केली व कागदपत्रांची तपासणी केली. त्यात अंगणवाडींसाठी धान्यपुरवठय़ाचे ते धान्य असून रत्ना महिला व लोकशाही महिला बचत गटाचे ते धान्य परमीट असल्याचे आढळून आले होते. 
जिल्हाधिका:यांना माहिती देण्यात आल्याने त्यांनी या बाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी चौकशी  केली व त्याचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांना दिला. यामध्ये 234 गहू व तांदळाच्या गोण्या असल्याचे आढळून आले असून भुसावळ येथून किती माल भरला व किती माल ट्रकमध्ये आहे, याबाबत माहिती घेतली जात असून या बाबत संबंधित स्वस्त धान्य दुकानदारास कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे जाधव यांनी सांगितले. 

भुसावळ येथून धान्य वाहतूक प्रकरणात हा माल महिला बचत गटांना देण्यासाठी नेत असल्याचे आढळून आले आहे. मात्र माल किती भरला होता व किती आहे, याची माहिती घेतली जात असून संबंधित स्वस्त धान्य दुकानदारास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 
- राहुल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी. 

Web Title: Show cause notice to Bhusawal grain shop owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.