श्रवण विकास मंदिर कर्णबधिर विद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:12 AM2021-07-18T04:12:29+5:302021-07-18T04:12:29+5:30
सावखेडा येथील श्रवण विकास मंदिर कर्णबधिर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी परीक्षेत कर्णबधिर प्रवर्गातून यश संपादन केले आहे. ...
सावखेडा येथील श्रवण विकास मंदिर कर्णबधिर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी परीक्षेत कर्णबधिर प्रवर्गातून यश संपादन केले आहे. शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. हर्ष डहारा ८२.४० टक्के मिळवून प्रथम आला आहे. द्वितीय मच्छिंद्र धनगर ८१.२० टक्के, तृतीय मोहित नारखेडे ७६ टक्के मिळवून गुणवंत ठरला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील, सचिव नन्नवरे, प्रदीप जंगले, मुख्याध्यापक पद्माकर इंगळे, मिलिंद पुराणिक आदींनी अभिनंदन केले आहे.
००००००००००००००
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूल (५ फोटो)
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूलमधून सुहासी बारी ही ९८.४० टक्के मिळवून प्रथम, लोकेश बोंडे ९४.६० टक्के मिळवून द्वितीय, जितेंद्र महाजन हा ९४.४० टक्के मिळवून तृतीय तसेच साक्षी बारी ही ९४ टक्के मिळवून चतुर्थ व रिया पाटील ही ९३.६० टक्के मिळवून पाचवी ठरली आहे. शाळेतील १७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. २४ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, समन्वयक गणेश लोखंडे यांनी अभिनंदन केले.
०००००००००००००
प्रगती माध्यमिक शाळा (६ फोटो)
प्रगती माध्यमिक शाळेतील ९० टक्क्यांच्यावर गुण मिळविणारे एकूण ९ विद्यार्थी आहे. शाळेतून प्रसाद मराठे हा ९६.४० टक्के मिळवून प्रथम आला आहे. द्वितीय भाग्यश्री मिस्तरी (९५ टक्के), तृतीय सुचित चव्हाण (९२.४० टक्के), विवेक पाटील (९२.४० टक्के), चतुर्थ कोमल महाजन (९२ टक्के), पाचवी रिद्धी लाठी (९१.६० टक्के) ठरली आहे. या विद्यार्थ्यांचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, मंगला दुनाखे, सचिन दुनाखे, शोभा फेगडे, ज्योती कुळकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.
०००००००००००००
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय (४ फोटो)
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयातून साक्षी पाटील ९४.२० टक्के मिळवून प्रथम आली आहे. द्वितीय क्रमांक रोहिणी बारी ९०.६० टक्के मिळवून तर ९०.४० टक्के मिळवून मानसी कुंभार हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. मागासवर्गीयांमधून ऋषिकेश लोहार याने ८६.७० टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विजय कोल्हे व ललित कोल्हे, अवधूत पाटील, सतीश खडके, मुख्याध्यापिका जे. आर. गोसावी, ए. व्ही. ठोसर, एच. जी. काळे आदींनी अभिनंदन केले आहे.
००००००००००००००
पुष्पावती गुळवे विद्यालय
पुष्पावती गुळवे विद्यालयातील मानसी जुनागडे ८८.८० टक्के मिळवून प्रथम, मुयरी राठाडे ८७.४० टक्के मिळवून तर चेतना खोडके ८७.२० टक्के मिळवून तृतीय ठरली आहे. विद्यालयातील ११० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष एस. डी. चौधरी, गोदावरी पाटील, चित्रा सरोदे, वंदना चौधरी, स्मिता चौधरी, मुख्याध्यापिका हेमलता पाटील, धनराज माळी यांनी अभिनंदन केले आहे.
००००००००००००००
महाराणा प्रताप विद्यालय
महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विशेष प्रावीण्यासह १३, तर ७९ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष रत्ना जैन, अशोक खिवसरा, प्रमोद खिवसरा, मुख्याध्यापिका साधना शर्मा, डी. एस. पाटील, डी. बी. सोनवणे यांनी अभिनंदन केले.
००००००००००००
मानवसेवा माध्यमिक विद्यालय
मानव सेवा माध्यमिक विद्यालयालयातील टिना वाघ ही ९२.४० टक्के मिळवून प्रथम आली आहे. गुणवंत थोरे ८७.६० टक्के मिळवून द्वितीय, तर परेश पाटील ८७.४० टक्के मिळवून तृतीय ठरला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे डॉ. आर. एस. डाकलिया, मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, माया अंबटकर, मुक्ता पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
०००००००००००००
जिजामाता माध्यमिक विद्यालय
जिजामाता माध्यमिक विद्यालयातील प्रथम क्रमांक माळी अंकिता गोपाळ ८४.३० टक्के मिळवून पटकाविला आहे. द्वितीय क्रमांक ठाकूर अपर्णा पप्पू ८४ टक्के, तृतीय क्रमांक नेहा धनगर ८१.४० टक्के हिने मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डी. एल. महाले, मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांनी अभिनंदन केले.