श्री चक्रधर स्वामी यांच्या शिकवणुकीचे आचरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 04:14 PM2018-09-12T16:14:55+5:302018-09-12T16:16:01+5:30

यावल येथे महानुभाव पंथीयांची धर्म परिषद उत्साहात

Shree Chakradhar Swami's teachings should be behaved | श्री चक्रधर स्वामी यांच्या शिकवणुकीचे आचरण करावे

श्री चक्रधर स्वामी यांच्या शिकवणुकीचे आचरण करावे

googlenewsNext
ठळक मुद्देमनुष्य जन्मास आल्यानंतर कसे आचरण ठेवावे यासंदर्भात श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे मनुष्याने त्यांची शिकवण आचरणात आणावीजीवनात प्रत्येकांने स्वामींची शिकवणूक आचरपणात आणावीश्रीमद् भगवतगीतेचे पारायण व धर्मध्वजारोहनानंतर झाली धर्मसभा

यावल, जि.जळगाव : महानुभाव पंथाचे श्री चक्रधरस्वामी अवतार दिनानिमित्ताने येथील फैजपूर रोडवरील जुन्या आॅईल मीलमध्ये मंगळवारी धर्मसभा घेण्यात आली. पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
धर्मपरिषदेस राज्यातून धर्मगुरूंनी येथे हजेरी लावली. सभेच्या अध्यक्षस्थानी आचार्य साळकर बाबा होते, तर कार्याध्यक्ष राजधर बाबा मराठे होते.
याप्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे यांनी सांगितले की, मनुष्य जन्मास आल्यानंतर कसे आचरण ठेवावे यासंदर्भात श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे मनुष्याने त्यांची शिकवण आचरणात आणली तर निश्चितच मनुष्याचे जीवन आनंदमयी होते. धर्मपरिषदेच्या निमित्ताने असो अथवा कोणत्याही हिंदू धर्मातील मेळाव्यात असो त्या-त्या पंथांचे संत-महात्मे नेहमी माणसांना धर्मसंस्काराचा मार्ग दर्शवित असल्याने त्यांचे विचार मानवी जीवणास निश्चित वळण देत असतात.
सभेचे अध्यक्ष आचार्य साळकर बाबा यांनी सांगितले की, श्री चक्रधर स्वामींनी विश्वबंधुत्व, स्त्रीमुक्ती, स्त्री शिक्षण यासाठी सुमारे ८०० वर्षांपूर्वीच क्रांती केली. त्यांनी संपूर्ण आयुष्य विश्वशांतीसाठी वेचले, असे सांगत प्रत्येकांने स्वामींची शिकवणूक आचरपणात आणावी, असे आवाहन केले.
पहाटे श्रीचे मंगलस्नान करण्यात येऊन श्रीमद् भगवतगीतेचे पारायण व धर्मध्वजारोहनानंतर धर्मसभा घेण्यात आली. याआधी शहरातून शाभायात्रा काढण्यात आली.
परिषदेस यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी, बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, नगरसेवक राकेश कोलते, डॉ. कुंदन फेगडे, अतुल पाटील, पौर्णिमा फालक, देवयानी महाजन यांच्यासह पंथाचे विश्वनाथबाबा लासूरकर, महंत वाघोडेकरबाबा, कानेराजबाबा, नीलेश बिडकर, कृष्णराज पाचराउत, आचार्य सुरेश मानेकरबाबा यांच्यासह राज्यभरातून संत, महंत, भिक्षुक, वासणिक यांच्यासह जिल्हाभरातून पंथबंधू उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुशास्त्री मराठे, यांनी केले. यशस्वितेसाठी सचिना कासार, वासुदेव जावळे, राजू फालक, प्रशांत साळी, देवसिंग पाटील, योगेश बारी, वासुदेव महाजन, सुमीत साळी, दीपक पाटील यांच्यासह युवावर्गाने परिश्रम घेतले.



 

Web Title: Shree Chakradhar Swami's teachings should be behaved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.