श्री सेवेकरी यांच्यातर्फे उद्या जळगावात स्वच्छता मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 05:25 PM2017-10-01T17:25:53+5:302017-10-01T17:32:45+5:30

डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात २ आॅक्टोबर रोजी स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. सकाळी ७ वाजेपासून सेवेकरी अभियानाला सुरुवात करणार आहेत.

Shri Sevakari will conduct Jalgaon Cleanliness campaign tomorrow | श्री सेवेकरी यांच्यातर्फे उद्या जळगावात स्वच्छता मोहिम

श्री सेवेकरी यांच्यातर्फे उद्या जळगावात स्वच्छता मोहिम

Next
ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यासह १५० शहरांमध्ये राबविले जाणार अभियान२ लाखांपेक्षा जास्त सेवेकºयांची तयार होणार मानवी साखळीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्याबाबत प्राप्त झाले पत्र

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१ : डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जळगाव जिल्ह्यासह १५० शहरांमध्ये २ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपासून स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांना २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे. त्या अनुशंगाने प्रतिष्ठानंतर्फे जळगाव जिल्ह्यासह १५० पेक्षा जास्त शहरांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यात शहरातील सुमारे ४५०० कि.मी.रस्ते, १२५० शासकीय कार्यालय, बस स्थानके, रुग्णालय, १७ किलो मिटरचा समुद्रकिनारा व ७५ रेल्वे स्थानकांमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानतर्फे साहित्य पुरवठा
स्वच्छता अभियान राबविताना २ लाखापेक्षा जास्त सेवेकºयांच्या मानवी साखळीच्या माध्यमातून ते यशस्वी करण्यात येणार आहे. प्रशासनावर कोणताही अतिरिक्त बोजा टाकला जाणार नाही. अभियानासाठी हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य प्रतिष्ठातर्फे पुरविण्यात येणार आहे. जमा केलेला कचरा सरकारी किंवा खाजगी वाहनातून डंपींग ग्राऊंडपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे.






 

Web Title: Shri Sevakari will conduct Jalgaon Cleanliness campaign tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.