भडगाव तालुक्यातील गुढे येथे आजपासून श्रीकृष्ण मंदिर यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 04:17 PM2019-03-18T16:17:15+5:302019-03-18T16:19:17+5:30
सालाबादाप्रमाणे द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर यात्रोत्सवास १९ मार्चपासून सुरुवात होत आहे.
गुढे, ता भडगाव, जि.जळगाव : सालाबादाप्रमाणे द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर यात्रोत्सवास १९ मार्चपासून सुरुवात होत आहे.
श्रीकृष्ण मंदिर यात्रोत्सवास गुढेसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संस्थेने हजेरी लावून उत्साहाने वाट पाहत असतात.
द्वारकाधीश श्रीकृष्ण श्रीकृष्ण प्रभूंचे हे भव्य असे मंदिर गुढे गावापासून एक किलोमीटर अंतरावर अतिशय निसर्गरम्य वातावरणात निर्माण केले आहे. या मंदिराचे गेल्या वर्षीच सुशोभिकरणाचे काम पंचकृष्ण ग्रुप तसेच ग्रामस्थांनी हाती घेतले होते. या वर्षाच्या यात्रेचा दिनक्रम १९ रोजी सकाळी सात वाजता गीतापारायणाने सुरू होईल. अकरा वाजता महाप्रसादाचा वाटप होईल. सायंकाळी चार वाजता गावातून सवाद्य द्वारकाधीश श्रीकृष्णाची मूर्ती पालखीमध्ये मिरवणूक निघेल.
२० रोजी भीमाभाऊ अंजाळेकर यांचा खान्देशी लोकनाट्य तमाशा यात्रेनिमित्त आयोजित केलेला आहे. २१ रोजी कुस्त्यांची विराट दंगल दुपारी दोन वाजता होईल. यावेळी गुढेसह परिसरातील कुस्तीशौकिनांनी, मल्लांनी कुस्तीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक पंचकृष्ण मित्र मंडळ तसेच ग्रामस्थांनी केले आहे.