श्रीक्षेत्र श्रावणतळे राजदेहरे परिसर होणार आध्यात्मिक केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:12 AM2021-07-09T04:12:09+5:302021-07-09T04:12:09+5:30
चाळीसगाव : श्रीक्षेत्र श्रावणतळे राजदेहरे येथील ७५० वर्षांपूर्वीचे पुरातन सर्वेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार सोहळा बुधवारी श्रीनाथ महाराज, आमदार मंगेश ...
चाळीसगाव : श्रीक्षेत्र श्रावणतळे राजदेहरे येथील ७५० वर्षांपूर्वीचे पुरातन सर्वेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार सोहळा बुधवारी श्रीनाथ महाराज, आमदार मंगेश चव्हाण व शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी भाविक भक्तांशी संवाद साधत त्यांच्यासोबत महादेवाच्या भंडाऱ्यात प्रसाद घेतला.
बालब्रह्मचारी श्रीनाथ महाराज यांच्या वास्तव्याने श्रीक्षेत्र श्रावणतळे परिसराचे आध्यात्मिक महत्त्व वाढले आहे व त्यांच्या प्रेरणेने आता सर्वेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार होत असल्याने याठिकाणी मोठे आध्यात्मिक केंद्र निर्माण होणार आहे. जीर्णोद्धार सोहळ्याला शिवाजी नाना हडपे, अनिल नागरे, संतोष मोकाटे, ज्ञानेश्वर बागुल, ज्ञानेश्वर माने, काशिनाथ फत्तू, सोमनाथ दत्तू, रमेश बन्सी राठोड, अप्पासाहेब माने, संतोष देशमुख, संग्राम पदंम जाधव यांच्यासह शेकडो भाविक भक्त उपस्थित होते.