श्रीराम भूमी अयोध्येतील वास्तव्य प्रेरणादायी : आचार्य जनार्दन महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:12 PM2020-08-07T22:12:29+5:302020-08-07T22:13:41+5:30
अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे साक्षीदार झालेले येथील सतपंत संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे अयोध्येवरून शुक्रवारी रात्री साडेआठला आगमन झाले.
वासुदेव सरोदे
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे साक्षीदार झालेले येथील सतपंत संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे अयोध्येवरून शुक्रवारी रात्री साडेआठला आगमन झाले. यावेळी त्यांचे देवस्थानात औक्षण करण्यात आले. यावेळी त्यांनी अयोध्येतील उपस्थितीही आनंद, प्रसन्नदायी व प्रेरणा देणारी होती, अशी प्रतिक्रिया दिली
गेल्या २ आॅगस्टपासून आचार्य जनार्दन महाराज श्रीराम भूमिपूजनासाठी अयोध्येत गेले होते. भूमिपूजन आटोपून आचार्य जनार्दन शुक्रवारी रात्री फैजपूर येथे पोहोचले. तत्पूर्वी त्यांचे विवरा, सावदा येथे सत्कार व स्वागत करण्यात आले. त्यानंतर फैजपूर येथील सतपंथ संस्थानमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांच्या आई व अन्य महिलांनी आचार्य जनार्दन महाराज यांच्या औक्षण केले.
यापुढे श्रीराम मंदिर उभारण्यासाठी लागणारे जे काही योगदान असेल ते करण्याचे श्रीराम मंदिर ट्रस्टला आश्वासन दिल्याची माहिती दिली. अयोध्येत त्यांनी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांची आवर्जून भेट घेतल्याची माहिती दिली.