शिरसोली येथून श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:14 AM2021-01-18T04:14:35+5:302021-01-18T04:14:35+5:30
यशस्वीतेसाठी संदीप पाटील, विकास काळे,धनराज ताडे, भूषण काटोले, प्रदीप वराडे, आकाश तायडे, भागवत बारी, अमोल काटोले, महेंद्र बारी, ...
यशस्वीतेसाठी संदीप पाटील, विकास काळे,धनराज ताडे, भूषण काटोले, प्रदीप वराडे, आकाश तायडे, भागवत बारी, अमोल काटोले, महेंद्र बारी, शुभम पवार, दीपक काटोले आदींनी परिश्रम घेतले.
`संस्कार गोष्टी` कार्यक्रम उत्साहात
जळगाव- येथील बाल निरीक्षण गृहातील अनाथ मुला-मुलींसाठी सुधर्मा सामाजिक संस्थेच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त `संस्कार गोष्टी` हा कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक गुन्हा शाखेेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले उपस्थित होते. यावेळी बकाले यांनी मुलांशी संवाद साधून `शाळेला व अभ्यासाला महत्व देण्याचे सांगितले. तर हेमंत बेलसरे यांनी मुलांना लोकमान्य टिळकांविषयी माहिती दिली. यावेळी बाल निरीक्षण गृहाच्या अधीक्षिका जयश्री पाटील, दिनकर बाविस्कर व नितीन तायडे उपस्थित होते.
युवक सप्ताहानिमित्त युवकांना मार्गदर्शन
जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे युवा दिनानिमित्त युवक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा.शरद पाटील यांच्या ऑनलाईन झालेल्या व्याख्यानात त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक हा निर्व्यसनी व शुद्ध चरित्र असणारा हवा, तरच देशाची प्रगती होणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन पौर्णिमा देशमूख यांनी केले. तर आभार चंद्रकांत पाटील यांनी केले. विषयाची मांडणी आदित्य नायर यांनी केली.