भक्तांच्या मांदियाळीविना श्रीं चा उत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:27+5:302021-06-04T04:13:27+5:30
वैशाख वद्य नवमी हे श्रींचा पुण्यतिथी दिवस. दरवर्षी मोठ्या जल्लोषात व विविध कार्यक्रम कथा प्रवचनांनी साजरा होणारा झिपरू ...
वैशाख वद्य नवमी हे श्रींचा पुण्यतिथी दिवस. दरवर्षी मोठ्या जल्लोषात व विविध कार्यक्रम कथा प्रवचनांनी साजरा होणारा झिपरू अण्णा महाराजांचा पुण्यतिथी उत्सव यंदा कोरोना महामारी व लाॅकडाऊनमुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. परंपरा उत्सवात खंड होऊ नये यासाठी शासनाचे नियम पाळत यंदाही गत वर्षाप्रमाणे साधेपणाने पुण्यतिथी साजरी करण्याचा प्रसंग ओढवला. श्रींना चंदनाची ऊटी लावून श्रींचे पंचामृत महाअभिषेक पूजन करण्यात आले. यावेळी शशिकांत कुलकर्णी व पुजारी जयंत गुरव यांच्या हस्ते अभिषेक आरती पूजन झाले. पुरोहित प्रसाद महाराज धर्माधिकारी यांनी वेद मंत्रोच्चार केला. याप्रसंगी श्रींचा जयजयकार व शंख, घंटानाद करण्यात आला. पालखीत श्रींच्या पादुका विराजमान करून मंदिरातच मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पाच पावले पालखी काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश चव्हाण, ग्रामविकास अधिकारी बी.एस. पाटील, ललित बऱ्हाटे, योगेश कोलते, स्मारक समितीचे पदाधिकारी रमेश सराफ, विनायक वाणी, मंगल तारे, कैलास व्यवहारे, ॲड. मोहन देशपांडे उपस्थित होते. सुपाशेठ सदाफळे, भागवत व्यवहारे यांनी ज्ञानेश्वरी पारायण वाचन केले. पालखी उत्सव याप्रसंगी सुनील शास्त्री महाराज, संजय माळी, सुपाशेठ सदाफळे यांच्यासह सहकाऱ्यांनी भजने म्हटली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. वासुदेव नथ्थू चौधरी डोंबिवलीकर यांनी मंदिरास श्रींच्या नैवेद्यासाठी चांदीचे ताट दान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. वासुदेव नथ्थू चौधरी डोंबिवलीकर यांनी मंदिरास श्रींच्या नैवेद्यासाठी चांदीचे ताट दान दिले.
घरोघरी घरातच पूजन व आरती
मंदिरात दर्शनासाठी गर्दी होऊ नये याकरिता भाविकांसाठी शासनाचे आदेशानुसार मंदिर बंद ठेवण्यात आले होते. स्मारक समितीने घरोघरी भाविकांनी पूजन व पारायण वाचन करा, असे आवाहन केले होते त्यानुसार नागरिकांनी महिलांनी घरातच श्रींचे पूजन व आरती केली. श्रींना प्रिय असलेला पिठलं, भाकरी, भजे, शिरा यांचा नैवेद्य अर्पण करून कोरोना महामारी निवारण करा, अशी श्रींना प्रार्थना करण्यात आली.