शुकशुकाट अन् कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 12:16 PM2020-07-08T12:16:00+5:302020-07-08T12:16:15+5:30
जळगाव : लॉकडाऊनला संपूर्ण शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे शहरातील अनेक रस्ते निर्मनुष्य झाले होते. संपूर्ण जळगावच जणू थांबल्यासारखे ...
जळगाव : लॉकडाऊनला संपूर्ण शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे शहरातील अनेक रस्ते निर्मनुष्य झाले होते. संपूर्ण जळगावच जणू थांबल्यासारखे झाले. काही रस्त्यांवर तुरळक वाहने होती तर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी दंड केला. त्यामुळे काही वेळातच जवळपास सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले. जळगावात लॉकडाऊनला एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले.
कंजरवाड्यात कसून चौकशी
कंजरवाड्यातून जाणारे प्रत्येक वाहन पोलिसांकडून तपासले जात होते. अत्यावश्यक असलेल्या व्यक्तींनाच पुढे सोडले जात होते. चारचाकी वाहनांची कसून चौकशी केली जात होती. या भागात दारुची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने पोलिसांनी खबरदारी घेत एकाही व्यक्तीला बाहेर पडू दिले नाही.
पोलीस अधीक्षकांनी घेतले दुचाकीस्वाराला फैलावर
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हे सकाळी ११.३० वाजता कार्यालयात येत असताना आकाशवाणी चौकात एक दुचाकीस्वार पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डॉ. उगले यांनी वाहन थांबवून त्या कर्मचाºयाजवळ गेले. संबंधित तरुण अरेरावी करीत असल्याने डॉ. उगले यांनी त्याला फैलावर घेतले. तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांना बोलावून संबंधित तरुणाला त्यांच्या ताब्यात दिले. या तरुणाविरुध्द १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले.
परिचारिकांचे मोठे हाल
लॉकडाऊनमुळे वाहनांना बंदी असल्याने सरकारी व खासगी रुग्णालयात काम करणाºया महिला परिचारिकांचे चांगलेच हाल झाले. बहुतांश परिचारिकांना रुग्णालयापर्यंत सोडण्यासाठी पती, मुलगा किंवा कुटुंबातील सदस्य दुचाकीने जात असताना त्यांना अडविण्यात आले. काव्यरत्नावली चौकात तर परिचारिकांना माघारी पाठविण्यात आले तर काही परिचालकांना दोन किलोमीटरपर्यंत चालत जावे लागले. या परिचारिकांना दुचाकी चालविता येत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या.
भाजीपाला मिळालाच नाही
रस्त्यावर तसेच गल्लोगल्ली भाजीपाला विक्रीलाही बंदी होती. प्रशासनाने नागरिकांना घरपोच पुरविण्याची घोषणा केली. मात्र, मंगळवारी दिवसभरात एकाही कुटुंबाला घरपोच भाजीपाला मिळाला नाही. भाजीपाला हवा असेल तर कुठे आणि कोणाशी संपर्क साधावा याचीही माहिती जनतेला देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबाचे हाल झाल्याचे दिसून येत होते.
पेट्रोलपंपावर मोजकेच पॉर्इंट सुरु
अत्यावश्यक सेवा असल्याने पंपावर मोजकेच पॉर्इंट सुरू ठेवून सेवा देण्यात आली. यासाठी एकेका पंपावर केवळ तीन ते चार कर्मचाºयांनाच बोलविण्यात आले होते. ओळखपत्राशिवाय कोणालाच पेट्रोल मिळत नव्हते. जीवनावश्यक गोष्टी म्हणून भाजीपालाही यावेळी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे कॉलनी व प्रभागांमध्ये हातगाडी व रस्त्याच्याकडेला थांबणारे भाजी विक्रेतेही कुठेच दिसले नाहीत. त्यांनीदेखील घरातच थांबणे पसंत केले. त्यामुळे अनेक परिसरात मंगळवारी
शुकशुकाट जाणवत होता.