विद्यार्थिनींचे फोटो काढणाऱ्याला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:42 PM2020-01-10T12:42:13+5:302020-01-10T12:42:32+5:30
जळगाव : रस्त्यावरून ये-जा करणाºया विद्यार्थिनींचे मोबाईलमध्ये फोटो काढणाºया तरूणाला नागरिकांनी चोप दिल्याची घटना गुरूवारी सकाळी ११़१५ वाजेच्या सुमारास ...
जळगाव : रस्त्यावरून ये-जा करणाºया विद्यार्थिनींचे मोबाईलमध्ये फोटो काढणाºया तरूणाला नागरिकांनी चोप दिल्याची घटना गुरूवारी सकाळी ११़१५ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुुुलाजवळ घडली़ गणेश लोणी (रा़ फत्तेपूर) असे तरूणाचे नाव आहे़
गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलजवळ एक तरूण रस्त्यावरून येणाºया-जाणाºया तरूणींचे मोबाईलमध्ये फोटो काढत होता़ त्यावेळी काही तरूणांना ते खटकले व त्यांनी त्यास कुणाचे फोटो काढतो आहे अशी विचारणी केली़ त्यावर त्याने कुणाचेही फोटो काढत नसल्याचे सांगितले़ परंतू, तरूणाचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये विद्यार्थिनींचे फोटो आढळून आले़ नंतर विचारणा करणाºया तरूणांसह नागरिकांनी त्या तरूणाला चांगलाच चोप दिला़ त्याचे नाव विचारले असता त्याने गणेश लोणी असे सांगितले व फत्तेपूर येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले़
विद्यार्थिनींचे फोटो काढणाºया गणेश या तरूणाला चोप दिल्यानंतर बेंडाळे महाविद्यालयाजवळ विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती़ नंतर संपूर्ण फोटो डिलीट करून त्या तरूणाला सोडून देण्यात आले़ मात्र, मारहाणीत त्या तरूणाचे कपडे फाटले़ दरम्यान, क्रीडा संकूलजवळ नेहमीच टवाळखोरांची गर्दी वाढत जात असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने त्या परिसरात गस्त वाढविण्याचे आवश्यक आहे़