भुसावळ शहरात चार वाजताच शटर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:22+5:302021-06-29T04:13:22+5:30
कोरोना पहिली व दुसऱ्या लाटेच्या अनुभवानंतर गेल्या दीड ते दोन वर्षापासून नागरिकांना वेळोवेळी शासनाने जाहीर केलेले निर्बंध स्वीकारण्याची आता ...
कोरोना पहिली व दुसऱ्या लाटेच्या अनुभवानंतर गेल्या दीड ते दोन वर्षापासून नागरिकांना वेळोवेळी शासनाने जाहीर केलेले निर्बंध स्वीकारण्याची आता मानसिकता दिसून येत असून शासनाने शनिवार, रविवार संपूर्ण बंद शिवाय २८ पासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू सोडून इतर आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. एखाद-दोन व्यावसायिक सोडले तर जवळपास सर्व नागरिक नियमाचे पालन करतांना दिसून आले.
पोलिसांचे पथक तैनात..
नियमाची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी याकरिता डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी बाजारपेठ, शहर, तालुका व शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना डेल्टा व डेल्टा प्लस च्या पार्श्वभूमीवर सूचना केल्या असून त्याचे पहिल्याच दिवशी तंतोतंत पालन झाल्याचे दिसून आले शहर पोलीस ठाणे समोर अष्टभुजा चौक बाजारपेठ परिसर महात्मा गांधी पुतळ्यासमोर पोलिसांचे जथेच्या जथ्थे उभे राहून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करताना दिसून आले तसेच अनेकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली.
तालुक्याची अशी आहे कोरोना स्थिती
शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण एप्रिलअखेर २०२० ला सापडला होता तेव्हापासून आज पर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ हजार १९० इतकी, तर उपचार घेऊन बरे झालेले १२ हजार ८०७ रुग्ण असून ३३४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
फोटो कॅप्शन:- घड्याळाचे काटे चारवर पडताच नागरिकांनी संस्कृतीने पटापट दुकाने बंद केल त्यानंतर बाजारपेठ अशी स्थिती दिसून आली.